सुनील भंडारे पाटील
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथे जाणाऱ्या रस्त्यालगत शेती फार्म हाऊस च्या मालकाने मनमानी कारभार करत अपघाताला निमंत्रण मिळेल असे रस्त्याच्या अगदी लगत काटेरी तारांचे कुंपण टाकले आहे त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे ,
स्वराज्याची दुसरी पंढरी समजल्या जाणाऱ्या धर्मपीठ शक्तीपीठ बलिदान पीठ प्रेरणापीठ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक गावाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून संपूर्ण हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यातून शंभू भक्त समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी येत असतात ,वर्षभर या मार्गावर शंभू भक्तांची गर्दी असते रस्त्याचे काम नुकतेच झाले असून वाहनांचा वेग देखील जास्त आहे,
संबंधित रस्त्यालगत असणाऱ्या फार्म हाऊसच्या मालकाने रस्त्याच्या कडे बरोबर काटेरी तारेचे कुंपण मारल्याने चुकून एखाद्याची गाडी या कुंपणाच्या बाजूला गेली तर कुंपणाच्या काटेरी तारेने काय होईल याचा अंदाज न लावलेला बरा कदाचित यामुळे एखाद्याला गंभीर दुखापत, किंवा जीवही जाऊ शकतो, संबंधित काटेरी तारेचे कुंपण तातडीने काढून टाकावे अशी मागणी ग्रामस्थ वारंवार करत आहेत,संबंधित डहाणूकरफार्म हाऊसचे मालकाशी वारंवार संपर्क करूनही संपर्क होऊ शकला नाही,