पुणे जिल्हा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पुणे शहर अध्यक्ष दिपकभाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयदेव आहिलू इसवे यांच्या प्रयत्नातून पर्वती विधानसभा, खडकवासला विधानसभा, हडपसर विधानसभा व कोथरूड विधानसभा मतदारसंघातील १०० शंभराहून अधिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पुणे शहराचे खंबीर नेतृत्व शहर अध्यक्ष दिपकभाऊ मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते राष्ट्रवादी ची मफलर गळ्यात घालून प्रवेश देण्यात आला
राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वीकारलेली फुले शाहू आंबेडकरांची समतावादी भूमिका मान्य असल्याने बहुजन समाजा साठी दादांनी घेतलेले कल्याणकारी निर्णय योग्य असल्याचे मत नोंदवत शंभर हुन अधिक कार्यकर्त्यानी दादांचे नेतृत्व मान्य करत शहर अध्यक्ष दिपकभाऊ मानकर व सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष जयदेव इसवे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधे सामाजिक न्याय विभाग च्या माध्यमातून प्रवेश केला त्या वेळी काही पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले,
सामाजिक न्याय विभागाचे काम चांगल्या प्रकारे सुरू असून दिपकभाऊनी अध्यक्ष जयदेव इसवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले,
सामाजिक न्याय विभागात काम करणारे पदाधिकारी प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, पी एच डी धारक, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट असे उच्चशिक्षित असून सामाजिक न्याय विभागाचा सामाजिक स्तर उंचावला असल्याचे पुणे शहर अध्यक्ष जयदेव इसवे यांनी सांगितले,
प्रवेश व पदाधिकारी निवड कार्यक्रम प्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे निरीक्षक डॉ गौतम पिसे, उपाध्यक्ष रघुनाथ भिसे, विक्रम मोरे, नितीन कडू, विनायक जाधव, प्रकाश वैराळ,सचिव प्रा. अशोक नाळे, प्रदेश प्रतिनिधी शांतीलाल मिसाळ, सेवादलाचे जाधव, राहुल वाघमारे, व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, पर्वती विधानसभा अध्यक्ष कुमार खंडागळे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष बाळा भोसले, हडपसर विधानसभा अध्यक्ष वामन धाडवे, कार्याध्यक्ष नामदेव उपाडे, कोथरूड विधानसभा अध्यक्ष अमित तुरूकमारे, छ.शिवाजी नगर विधानसभा अध्यक्ष युवराज जेठीथोर, यांनी विशेष सहकार्य केले.