महाराष्ट्रातील नुरा कुस्ती बंद करण्याबाबत आपण एक पाऊल उचलत असुन आमचे गाव लोणीकंदचे मैदान दीनांक १६ एप्रिल रोजी आहे .या मैदानात शेवटची कुस्ती १५०००० /- रुपयांची ठेवण्यात आलेली आहे . ही कुस्ती निकाली ठेवण्यात आलेली असुन जो जिंकेल त्यास एकुण रकमेच्या ७० टक्के इनाम व पराभुत होईल त्यास ३० टक्के इनाम दीले जाईल असे संदीप आप्पा भोंडवे यांनी सांगितले,
पै.पृथ्वीराज मोहोळ याने १५००००/- रुपयांवर निकाली कुस्ती करण्याची तयारी दर्शवली असुन कोथरूड व फुलगाव येथील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत जे कुस्तीगीर महाराष्ट्र केसरी वजनगटामध्ये मॅट व माती विभागामध्ये सेमीफाइनल पर्यंत पोहचले आहेत त्या कोणत्याही पैलवानांसोबत पै.पृथ्वीराज मोहोळ काटा व निकाली कुस्ती खेळण्यास तयार आहे...