शिक्रापूर प्रतिनिधी
आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार कोरेगाव भीमा ते वढु बुद्रुक ( तालुका शिरूर ) रस्त्यावर फडतरे वस्ती येथे थार गाडीच्या झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे,
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार केशरबाई अशोकराव निकम (वय 64) या जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी रस्त्याच्या बाजूने चालत असताना मंगळवार ता 9 रात्री 10:20 मी नि वेगात येणाऱ्या थार महिंद्रा गाडीने त्यांना जोरदार धडक दिल्याने अपघाताचे स्वरूप अतिशय गंभीर झाले असून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, कोरेगाव भीमा वडू बुद्रुक रस्त्यावर रस्त्याचे काम नवीन झाले असून वाहनांच्या वेगावर मर्यादा नसल्याने लहान मोठे अपघात होऊ लागले आहेत, तातडीने या मार्गावर गतिरोधक बसवण्याची विनंती तसेच मागणी ग्रामस्थ करत आहेत, रस्त्याच्या कडेच्या बाजूने शतपावली करणाऱ्या महिलेला अतिशय वाईट पद्धतीने ठार गाडीने धडक मारल्याने गंभीर अपघात झाल्याने या महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे,
अपघातानंतर संबंधित काळ्या कलरची थार गाडी व चालक फरार झाला असून त्याला प्रत्यक्ष दर्शनी लोकांनी पाहिल्याचे सांगितले, माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडली असून चालक फरार झाल्याने लोकांमधून क्रोध व्यक्त होत आहे, केशरबाई निकम यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिक्रापूर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे, असे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले,