सुनील भंडारे पाटील
राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आपला उमेदवार जाहीर केला. बहुजन मुक्ती पार्टीचे प्रधान महासचिव अमोल लोंढे यांच्या शिफारशीनुसार बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवेन्द्र प्रताप सिंह यांनी शिरूर लोकसभेसाठी विकास सुरेश कसबे यांची उमेदवारी जाहीर केली आहे,
यानंतर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने वाघोली मध्ये मेळावा घेण्यात आला, कसबे यांच्या रूपाने बहुजन मुक्ती पार्टीला शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये तरूण चेहरा मिळाला आहे. बहुजन मुक्ती पार्टीने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून बहुजनांचे प्रश्न सोडविण्यासाठी मला लोकसभेत जायचे आहे असे शिरूर लोकसभेचे उमेदवार विकास कसबे यांनी सांगितले