सुनील भंडारे पाटील
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिवशी वढू बुद्रुक (तालुका शिरूर), तसेच तुळापूर (तालुका हवेली) येथे शंभूराजांच्या समाधी वरती नतमस्तक होण्यासाठी लाखो शंभू भक्त यांचा जनसागर लोटला होता, बलिदान दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,
आज सकाळी पहाटे 5:30 वा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती, त्याचप्रमाणे जगत जननी परिवार महिला यांच्या वतीने महापूजा करण्यात आली, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने वढु बुद्रुक गावामध्ये मुक पद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये मोठ्या संख्येने तरुणांनी, आबाल वृद्ध महिलांनी सहभाग घेतला होता,त्यानंतर समाधीची शासकीय पूजा करण्यात आली जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, प्रांत अधिकारी स्नेहा देवकाते, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, अप्पर पोलीस अधिकारी चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डोले, शिक्रापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, रांजणगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमोडे, गोपनीय चे संदीप कारंडे, हेमंत कुंजीर, पंडित मांजरे, अशोक केदार, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, यांच्या हस्ते समाधीचे पूजन करण्यात आले,
धर्मवीर शंभूराजे बलिदान दिनानिमित्त शंभूराजांचे सोळावे वंशज उदयनराजे भोसले महाराज, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक बापू पवार, आमदार महेश लांडगे, माजी आमदार बापुसाहेब पठारे, यांनी समाधीस्थळी भेट दिली, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती, ग्रामपंचायत वढु बुद्रुक यांच्या वतीने अल्पोपहार, थंड शुद्ध पिण्याचे पाणी याची व्यवस्था करण्यात आली होती,
पोलीस खात्याच्या वतीने सुमारे 300 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, शंभू भक्तांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती, समाधीस्थळी सर्वत्र वातावरण भगवे मय झाले होते, सकाळी नऊ ते बारा पर्यंत संग्राम महाराज भंडारे यांचे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते, बंदुकींची शासकीय सलामी देण्यात आली, दुपारी एक वाजता वेद पठण तसेच मंत्रोपचाराने हेलिकॉप्टर द्वारे समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, यावेळी धर्मसभा तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
धर्मवीर शंभूराजे बलिदान दिनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे हजारो तरुणांनी शाकाहाराकडे वळण घेतले असून त्यांनी शपथ घेऊन तुळशीची माळ गळ्यात घातली, बलिदान दिनानिमित्त गावामध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, दररोज रात्री आठ वाजता राज्यातील कानाकोपऱ्यातील नामांकित ह भ प महाराजांचे कीर्तने ठेवण्यात आली होती, रात्री नऊ वाजता धर्मवीर शंभूराजांच्या जीवनावरील " इथे ओशाळला मृत्यू " या ज्वलंत नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे, धर्म जागरण समितीच्या वतीने स्वधर्मात परतलेल्या लोकांचा सन्मान करण्यात आला,