अमरावती प्रतिनिधी
पथरोट.... निसर्गाच्या बदलामुळे काल रात्री झालेल्या पावसाने आज सकाळपासूनच वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. त्याचा परिणाम म्हणून तेराही मतदान केंद्रावर मतदारांचा प्रचंड उत्साहाच्या रूपात दिसून आला.
यादरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती वासंती ताई मंगरोळे यांनी तेराही मतदान केंद्रावर फेरफटका मारून परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी उन्हा तान्हात उभ्या असलेल्या मतदार बांधवांना पिण्याच्या पाण्याची त्यांनी स्वखर्चाने व्यवस्था करून दिली.
निवडणूक आयोगाकडून दर वेळच्या निवडणुकीच्या वेळेस मतदार पर्यंत पोहोचणाऱ्या चिठ्ठ्यासुद्धा यावेळी अनेक मतदारांपर्यंत न पोचल्याने त्यांना मतदान करताना स्वतःचे नाव मतदान केंद्र व खोली क्रमांक अनुक्रमांक शोधतांना खूपच दमछाक करावी लागली. तर मतदार यादी मध्ये नाव एकाचे त्यावर फोटो दुसऱ्याचे असाही प्रकार समोर आल्याने मतदान करताना एकच गोंधळ उडालेला दिसून आला.
दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ४० वर पोहोचली होती.