पुणे जिल्हा प्रतिनिधी
काल लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यामध्ये राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघात मतदान झाले.
आश्चर्याची बाब म्हणजे देशात प्रगत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सर्वात कमी केवळ ५३.५१% मतदान झाले.
पश्चिम बंगाल ७१.८४%
मणिपुर ७६.०६%
छत्तीसगड ७२.१३%
आसाम ७०.६६%
त्रिपुरा ७७.१७%
हे आकडे काय दर्शवितात..
तर मागील काही दिवसांपासून राजकारणाचा स्तर घसरलेला आहे. पुढार्यांमध्ये थोडीही नीतिमत्ता शिल्लक राहिलेली नाही. स्वतःचे भ्रष्टाचार लपविण्यासाठी पक्षांतरे होत आहेत. केवळ सत्ता आणि सत्तेसाठी सर्वकाही सुरू आहे. आपण निवडून दिलेला आमदार खासदार उद्या याच पक्षात राहील का? याचा भरोसा जनतेला नाही.
भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील शीर्ष नेतृत्वाने तर महाराष्ट्राच्या राजकारणात उच्छाद घातला आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच पक्षात सामावून घेतले. पक्ष फोडले.. घरे फोडली. अंतरवालीत शांततेत सुरू असलेल्या आंदोलकांवर जीवघेणा लाठीचार्ज व गोळीबार केला. समाजासाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर SIT लावली. हिंदू-मुस्लिम प्रयोग फसला म्हणून मराठा-ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न झाला. ED, CBI सारख्या संस्थांचा गैरवापर होत आहे.
या चर्चा राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांपर्यंत मर्यादित न राहता सर्वसामान्य जनतेमध्ये होत आहेत. *सामान्य जनतेमध्ये राजकारण्यांबद्दल प्रचंड नैराश्य आहे.* त्याचाच परिणाम कालच्या मतदाराच्या आकडेवारी मध्ये दिसून आला आहे.