पुणे जिल्हा प्रतिनिधी
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन येथील आरोपीच्या कोठडी मध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणाबाबत म्हसोबाचीवाडी गावचे सुपुत्र ॲड.तुषार झेंडे (पाटील) यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती व मृताच्या वारसांना 10 लाख रुपये भरपाई देण्याची मागणी केली होती.
त्या अनुषंगाने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्याचे मुख्य सचिव यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
याबाबत सविस्तर चौकशी होऊन *CID मार्फत IPC 302, 330 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, अरुण उके यांना अटक केली असून, मृत राजकुमार अभयकुमार यांचे वारसांना 7.5 लाख रुपये भरपाई देवून* त्याचा पूर्तता अहवाल गृह विभाग मंत्रालयाने सादर केला असून काल दिनांक 12/4/2024 रोजी तक्रार बंद केली असल्याचे आयोगाने कळविले आहे.
याचे सर्व श्रेय आपल्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या मीडिया वर्तमान पत्रांना आहे, कारण सदर घटना वर्तमान पत्रात वाचल्या नंतर त्याबाबत पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे कार्यालयातून घटनेचे माहिती घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
याबाबत आपण आपल्या वर्तमान पत्रातून अधिक प्रसिद्धी द्यावी जेणे करून समाजातील नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची हिम्मत मिळणार आहे असे माध्यमांना बोलताना ॲड. तुषार झेंडे (पाटील) म्हणाले आहेत.