ब्रेकिंग....! शेवाळवाडी परिसरात गोळीबार

Bharari News
0
लोणी काळभोर प्रतिनिधी 
                 पुणे शहरातील हडपसर परिसरातील शेवाळेवाडीत एकावर गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत जयवंत खलाटे ( सध्या रा. सैनिक कॉलनी गोंधळेनगर हडपसर मुळगाव बारामती )असे जखमी झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी गोळीबार करणारा आरोपी सुधीर रामचंद्र शेडगे (सध्या राहाणार सैनिक कॉलनी गोंधळेनगर मुळगाव भोर ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर दोघे माजी सैनिक आहे.
                 सिक्युरिटीच्या वादातून शेवाळेवाडीत भरदिवसा गोळीबार झाल्याने शेवाळेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. सोसायटी सिक्युरिटी कामगार पळविण्याच्या वादातून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकात बाचाबाची झाल्याने रागाच्या भारात गोळीबार करण्यात आला. यामध्ये ठेकेदार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एक माजी सैनिक आरोपींस अटक केली आहे.सकाळी अचानक गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख हडपसर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे पोलिस निरीक्षक मंगल मोढवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.
              घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख, हडपसर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे पोलिस निरीक्षक मंगल मोढवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.हडपसर पोलिस स्टेशन गुन्हे पोलिस निरीक्षक मंगल मोढवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी दोघेही माजी सैनिक असून दोघांचा सिक्युरिटी ठेकेदारीचा व्यवसाय आहे. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शेवाळवाडी येथील संपन्न होम सोसायटी समोर दोन ठेकेदारांमध्ये सिक्युरिटी कामगारांवरून वाद झाला. दोघांत बाचाबाची झाल्याने गोळीबार करण्यात आला. सिक्युरिटी ठेकेदारांमध्ये या अगोदर दामोदर विहार येथे वाद झाला. 
                    त्यानंतर ही घटना शेवाळेवाडीतील संपन्न होम्स सोसायटी समोर घडली. आरोपीने दोन गोळ्या झाडल्या, यामध्ये एक गोळी जयवंत खलाटे यांच्या पायाला लागली तर एक जमिनीवर लागली. यामध्ये खलाटे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबार घटनेमुळे शेवाळेवाडी परिसरामध्ये नागिरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे व गुन्हे शाखेच्या मंगल मोढवे करीत आहेत.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!