पुणे जिल्हा प्रतिनिधी
प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता सयाजी शिंदे यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सयाजी शिंदे यांच्या छातीत दुखत होते. हा त्रास जास्त जाणवू लागल्याने काही तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये हृदयाची एक व्हेन ब्लॉक असल्याचं समजलं. डॉक्टरांनी तातडीने अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर साताऱ्यात एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, सयाजी शिंदे यांना काही दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटत होतं. त्यांनी रूटीन चेकअप म्हणून काही तपासण्या करून घेतल्या. यात ECG मध्ये काही चेंजेस दिसले. हृदयाच्या एका लहान भागाची हालचाल कमी असल्याचं जाणवलं होत.
सयाजी शिंदे यांनी नुकताच 65 वा वाढदिवस साजरा केला. नाटक आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा त्यांनी उमटवला आहे.
तसेच मराठीच नव्हे तर हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत ही त्यांनी काम केले आहे. सातारा जिल्ह्यातल्या एका लहानशा गावातून चित्रपटसृष्टीत आलेल्या सयाजी शिंदे यांनी बॉलिवूड आणि टॉलिवूड गाजवल आहे. चित्रपटसृष्टीत यश आणि पैसा मिळवल्यानंतर सयाजी शिंदे यांनी सामाजिक कार्यातही स्वत:ला झोकून दिलं आहे. राज्यभरात वृक्षारोपण मोहिम ते राबवत आहेत. सह्याद्री देवराई उपक्रम त्यांनी सुरू केला