पुणे जिल्हा प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आसून गावामध्ये चांदगुडे वस्ती, कवडे वस्ती ,दाभाडे वस्ती, तसेच थोरवे वस्ती येथे केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून दोन पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या आहेत परंतू त्यातील एकच योजना ही कार्यान्वीत असून दुसरी योजना ही आचारसंहितेमुळे उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत आहे ती योजना चालू झाल्यानंतर बऱ्यापैकी गावाच्या तसेच वाडयावस्त्यावरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो परंतू ते आता तरी शक्य होणार नाही हि सध्याची परस्थिती आहे.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे तसेच गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने सर्व बोअर तसेच विहीरींची पाण्याची पातळी खुपच मोठया प्रमाणात खालावल्याने गावातील तसेच वाडयावस्त्यांवरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे, पशुधन वाचवण्यासाठी गावातील तसेच वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थ विकतचे पाणी आणून पशुधनाची तसेच स्वतःची तहान भागवत आहेत असे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
तसेच म्हसोबावाडी येथे दुध उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांच्याकडे पशुधन मोठ्या प्रमाणात आहे त्यांना पिण्यासाठी पाणी लागते परंतू संबंधीत प्रशासन हे लोकसभा निवडणुकीत व्यस्त आसल्याने या पाणी टंचाईकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही असे चित्र आता निर्माण झाल्याचे पाहवयास मिळत आहे.
म्हसोबाचीवाडी गावातील तसेच वाडयावस्त्यांवरील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांचे म्हणने असे आहे की, संबंधीत विभागाने पाणीटंचाई कडे लक्ष देऊन गावामध्ये टँकर चालू करावा तसेच पशुधनासाठी चाराछावण्या चालु कराव्यात अशी मागणी आता गावातील तसेच वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थ करत आहेत.