गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत आहेत. तसेच राज्यातील कित्येक ठिकाणी तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही झाल्याचे पाहवयास मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त देखील झाले आहेत. त्यामुळे घरातील पंखा, एसी, फ्रीज यांसारख्या इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वीज वापर देखील वाढत आहे.अशातच उन्हाळ्यात वाढत्या विजेचा अतिवापर पाहता अदानी वीज समूहाने एक मोठा निर्णय घेतला आहे. अदानी वीज कंपनीची वीज महागली असून त्याचा फटका तब्बल 30 लाख वीज ग्राहकांना बसणार आहे.
अदानी कंपनीने गेल्यावर्षी झालेल्या इंधन खर्चातील 318 कोटी 38 लाख रुपयांची वाढ वसूल करण्यासाठी राज्य ऊर्जा नियामक आयोगाकडे आदरपूर्वक प्रस्ताव सादर केला आहे.याबाबत राज्य ऊर्जा नियामक आयोगाने सोमवारी मान्यता देखील दिली आहे. ही रक्कम इंधन अधिभारा मधून 24 मे या काळात ग्राहकांकडून वसूल केली जाणार आहे. वाणिज्य, औद्योगिक आणि इतर ग्राहकांसाठी, इंधन अधिभार वापरा नुसार निर्धारित केला जाणार आहे.