अमरावती प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित नजीकच्या कौसल्याबाई बारब्दे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिंचोली बु. दि.१५ ते १९ एप्रिल दरम्यान वर्ग ४ ते ९ च्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी उन्हाळी छंद शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात योगशिक्षिका.वैशाली जावरकर व कु.समीक्षा गणगणे यांनी विद्यार्थ्यांना योग, अबेकास,झुंबा,आरोबिक्स,वैदिक गणित,इंग्रजी संभाषण,नृत्य,क्राफ्ट मेकिंग यांचे धडे दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका कु.पद्मावती तेलगोटे,प्रमोद निर्मळ, मनोज सोनपरोते,ज्ञानेश्वर खंडारे,आशिष पाटील, कु.दिपाली पावडे,सुनिल गिरी,सतिष सोळंके,रमेश सोळंके,विनोद पवार,रवींद्र काळमेघ,अमोल पाटील व संजय चव्हाण यांनी परिश्रम घेतले.