सुनील भंडारे पाटील
फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचालित फ्रेंड्स नर्सरी /प्रायमरी/ सेकंडरी स्कूल कोरेगाव-भीमा तालुका- शिरूर जिल्हा- पुणे चा एस एस सी मार्च 2024 परीक्षा निकाल 100 % लागला आहे. एस एस सी परीक्षा मार्च 2024 साठी एकूण 110 विद्यार्थी बसलेले होते. त्याायापैकी संपूर्ण म्हणजे 110 विद्यार्थी पास झाले आहेत अशी माहिती शाळेचे माजी अध्यक्ष, संचालक दिलीप भोसले यांनी दिली,
फ्रेंड्स फ्रेंड्स इंग्लिश मीडियम स्कूल निकालाची परंपरा कायम ठेवल्याने परिसरातून कौतुक होत आहे, एकेकाळी कोरेगाव भीमा मधील वर्गमित्र एकत्र येऊन या संस्थेची स्थापना करण्यात आली होती त्याचा आता वटवृक्ष झाला आहे, हजारो विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत, कुशल शिक्षक वर्ग यामुळे या शाळेचा परिसरामध्ये नावलौकिक झाला आहे, दहावीच्या परीक्षेमध्ये पहिला ते पाचवा नंबर पुढील प्रमाणे,
प्रथम क्रमांक- कुमारी सृष्टी ज्ञानोबा गव्हाणे 94.20 %
द्वितीय क्रमांक- कुमारी रिया तुषार पिसाळ 91.20 %
तृतीय क्रमांक - कुमार आश्विन अशोक भोसले 90.80 %
चतुर्थ क्रमांक - कुमार रेहान इरफान अन्सारी 89.00%
पाचवा क्रमांक - कुमारी साक्षी विजयकुमार गुप्ता 88.20%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे, उपाध्यक्ष प्रकाश खैरमोडे, सचिव दिलीप भोसले , सर्व संचालक मंडळ, पालक, मुख्याध्यापक ,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी , कोरेगाव भीमा ग्रामस्थ यांनी हार्दिक अभिनंदन केले.