कान्हूर मेसाई (तालुका शिरूर) येथील विद्याविकास मंडळाच्या अध्यक्षपदी अंजली संतोष घोलप तर सचिवपदी सदाशिव ज्ञानोबा मुंडे यांची बिन विरोध निवड करण्यात आली .सर्व ग्रामस्थांच्या व माजी संचालक मंडळाच्या सहमतीने ही निवड झाली,
यावेळी उपाध्यक्ष तान्हाजी खर्डे ,उपसेक्रेटरी बाळासाहेब पुंडे ,खजिनदार पोपट तळोले ,संचालक अण्णासो साकोरे ,रोहिदास ढगे , दादाभाऊ खर्डे, रतन तळोले ,रमेश खर्डे , विलास पुंडे , अमोल पुंडे , संदीप तांबे , अनिलचौधरी ,प्रदीप पुंडे यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली. विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तसेच संचालक मंडळ बिनविरोध करण्याकामी माजी अध्यक्ष गंगाधर पुंडे , सचिव सुदाम तळोले ,
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बबनदादा शिंदे , जमादार संतोष घोलप ,सोसायटीचे सचिव सुखदेव खर्डे ,माजी सरपंच बंडू पुंडे ,दीपक तळोले, सोपान पुंडे ,शहाजी दळवी , भास्कर पुंडे व सर्वच शिक्षणप्रेमींचे मोलाचे सहकार्य लाभले . यामध्ये सचिव म्हणून निवड झालेले सदाशिव पुंडे यांनी अध्यक्ष म्हणून मागील कालावधीत काम केल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा या संचालक मंडळात नक्कीच होईल व संस्थेचा,विद्यालयाचा व विद्यार्थ्यां चा सर्वांगीण विकास व्हावा याच भावनेने निवडणुक बिनविरोध करण्याचे ग्रामस्थांचे प्रयोजन आहे .