श्री शंभुछत्रपती राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगड आयोजित छत्रपती संभाजीराजे जयंती निमित्त रक्तदान राजासाठी, काल दिनांक 12.05 2024 रविवार रोजी महाराष्ट्रातील 11 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ,
छत्रपती संभाजी महाराज चौक, भैरवनाथ मंदिर,सणसवाडी छत्रपती चौक गोलेगांव रोड शिरूर येथे सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते,रक्तदात्यांनी उस्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले
सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या प्रत्येक रक्तदांत्याचे आभार राज्य रक्त संक्रमण परिषद, संजीवनी ब्लड बँक यांच्या प्रयत्नातूनं रक्तदान शिबीर संपन्न झाले.
सणसवाडी येथे 65 तर शिरूर येथे 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले व दरवर्षी रक्तदान करण्याचा संकल्पही केला.