पुणे जिल्हा प्रतिनिधी
बारामतीमधील गुंडगिरी व गुन्हेगारीचा विषय आता ऐरणीवर आल्याचं दिसून येत आहे.कारण, युवक-युवतीचे कपडे काढून त्यांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत सदरील घटना घडल्याने एकच खळबळ उडालेली आहे. शुक्रवारी रात्री ७ ते ८ वाजन्याच्या सुमारास सदरील घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशष म्हणजे बारामतीमध्ये शिकण्यासाठी आलेले हे विद्यार्थी मित्र फिरायला गेले असता असा प्रकार घडला, युवतीच्या अंगावरील दागिनेही काढून नेल्याने विद्यार्थी सुरक्षेचा आता प्रश्नही उपस्थित होत आहे.
बारामतीत शुक्रवारी रोजी युवक आणि युवती गाडीमध्ये गप्पा मारत असताना त्यांना दोन अज्ञात आरोपींनी लुटले या युवकांना लुटल्याने बारामती परिसरात खळबळ उडालेली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी दोघांकडील पैसा व ऐवज लुटल्या नंतर दोघांचे कपडे बळजबरीने काढायला लावले. त्यानंतर, नको त्या अवस्थेत दोघांचे फोटो काढून घेतले आणि हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात सदरील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. युवतीच्या अंगावरील नव्वद हजारांचे दागिने बळजबरीने लंपास केल्याचा देखील अज्ञात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गोजूबावी हद्दीत बारामती विमानतळा जवळ ही घटना घडलेली आहे.
बारामतीत शिकत असलेली तरुणी मित्रासह बारामती विमानतळाच्या परिसरात फिरण्यासाठी गेली असता, गाडीत गप्पा मारत बसलेल्या या दोघांना 30 ते 35 वयोगटातील दोन व्यक्तींनी हटकले. त्यानंतर, तिच्या गळ्यातील सोनसाखळी व कानातील दागिने असा नव्वद हजारांचा ऐवज काढून घेतला. यावेळी, आरोपीने तिच्या मित्राला दगडाने मारहाण करत दोघांनाही गाडीतून बाहेर काढले व एका खड्ड्यात नेऊन अंगावरील कपडे जबरदस्तीने काढायला भाग पाडले. तसेच,नको त्या अवस्थेतील फोटो काढून घेऊन ते व्हायरल करण्याची धमकीही दिली. या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात ३९४ कलमा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. मात्र, अद्यापही अज्ञात आरोपी कोण आहेत, याचा शोध अद्यापपर्यंत लागलेला नाही. तसेच पोलिसांकडून सदरील घटनेचा तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.