पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे,लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा उद्या १३ मे ला पार पडणार आहे. या टप्प्यात पुणे येथेही मतदान प्रक्रिया पार पडणार असल्यानं यादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी येथील पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे.मतदानावेळी पैसे वाटले जात असल्याच्या घटना घडत याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील नऊ हजार दोनशे पंचावन्न गुंडांची झाडाझडती घेतली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या वेळी गुंडांचा वापर केल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता. यानंतर महाविकास आघाडीचे पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी देखील निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्यात येणार असल्याचा आरोप महायुती वरती केलेला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी म्हणून शहरातील तब्बल ९२५५ गुंडांची झाड झडती घेतली आहे.
या कारवाई दरम्यान पुणे पोलिसांनी आर्म्स ऍक्टचे सात गुन्हे दाखल करून आरोपींच्या ताब्यातून २ तलवार, ४ कोयते व १ सुरा जप्त केलेले आहेत. तसेच ११ आरोपींवर तडीपार आदेशाचे भंग केल्या प्रकरणी कारवाई केली आहे. यातील ६० जणांवर जामीनपात्र, अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहेत. शहरातील विविध पोलीस स्टेशन कडून नाकाबंदी दरम्यान ३ हजार १४४ संशयित वाहन चालकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ४४७ जणांवर आतापर्यंत कारवाई करत ३ लाख ८५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच वाहतूक शाखेकडून २ हजार ४९३ संशयित वाहन चालकांची तपासणी केली गेली आहे.
४७३ जणावंर कारवाई करुन ४ लाख ३५ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.वाहतूक शाखेकडून २ हजार ४९३ संशयित वाहन चालकांची तपासणी केली गेली. वाहतूक शाखेकडून २ हजार ४९३ संशयित वाहन चालकांची तपासणी केली गेली. ४७३ जणावंर कारवाई करुन ४ लाख ३५ हजार ४५० रुपयांचा दंड आतापर्यंत वसूल करण्यात आलेली आहे.