शिरूर लोकसभा निवडणुकीत येणाऱ्या 6 विधान सभेत साहित्यांचे विवरण

Bharari News
0
लोणी काळभोर प्रतिनिधी
          शिरुर लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले असून सर्व साहित्य सुस्थितीत मतदान केंद्रावर पोहोचेल याची आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली.
          जुन्नर विधानसभा मतदारसंघात शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर येथून निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. ४६ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १८ टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. १ हजार ६८ बॅलेट युनिट, ३५६ कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता ५४ एस.टी.बस आणि २७ जीपची व्यवस्था करण्यात आली.
          आंबेगांव विधानसभा मतदारसंघात शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खुर्द येथून निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. १७० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ३४ टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. १ हजार २० बॅलेट युनिट, ३४० कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता ७२ एस.टी.बस आणि ५२ जीपची व्यवस्था करण्यात आली.
          खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात हुतात्मा शिवराम हरी राजगुरु तालुका क्रीडा संकुल तिन्हेवाडी, राजगुरुनगर येथे निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. ९२ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २० टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. १ हजार १५५ बॅलेट युनिट, ३८५ कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता ६४ एस.टी.बस आणि ८ जीपची व्यवस्था करण्यात आली.
          शिरुर विधानसभा मतदारसंघात राज्य वखार महामंडळ गोदाम राजंणगाव येथे निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ८० टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. १ हजार ३१७ बॅलेट युनिट, ४३९ कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता ७१ एस.टी.बस आणि ७ जीपची व्यवस्था करण्यात आली.
           भोसरी विधानसभा मतदारसंघात घरकुल इडब्ल्युएस टाऊनहॉल, चिखली येथे निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. १५० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ५० टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. १ हजार ४०४ बॅलेट युनिट, ४६८ कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता ११५ एस.टी.बस आणि जीपची व्यवस्था करण्यात आली.
हडपसर विधानसभा मतदारसंघात साधना शैक्षणिक संकुल माळवाडी हडपसर येथे निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. १८० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ५१ टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. १ हजार ५६३ बॅलेट युनिट, ५२१ कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता १०६ एस.टी.बस आणि २२ जीपची व्यवस्था करण्यात आली
           २ हजार ५०९ मतदान केंद्रांवर होणार मतदान
शिरुर लोकसभा मतदारसंघात २ हजार ५०९ मतदान केंद्रे असून यामध्ये १ हजार १८९ मतदान केंद्र शहरी भागात तर १ हजार ३२० मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत. ४८० ठिकाणी एकल मतदान केंद्र, २२२ ठिकाणी दोन मतदान केंद्र, ८७ ठिकाणी तीन मतदान केंद्र, ५९ ठिकाणी चार मतदान केंद्र, ३६ ठिकाणी पाच मतदान केंद्र, २७ ठिकाणी सहा मतदान केंद्र तर ७० ठिकाणी सहापेक्षा अधिक मतदान केंद्रांची स्थापन करण्यात आली आहे.
            जुन्नर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात ३५६ मतदान केंद्र, आंबेगांव ३३८ मतदान केंद्र आणि २ सहाय्यकारी मतदान केंद्र. खेड आळंदी ३८५ मतदान केंद्र, शिरुर ४०५ मतदान केंद्र आणि ३४ सहाय्यकारी मतदान केंद्र, भोसरी ४६४ मतदान केंद्र आणि ४ सहाय्यकारी मतदान केंद्र, तर हडपसर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात ४९४ मतदान केंद्र आणि २७ सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत.
           १ हजार २६८ मतदान केंद्रांचे वेबकास्टींग शिरुर लोकसभा मतदारसंघात एकूण १ हजार २६८ मतदान केंद्रांचे वेबकास्टींग करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर सुरु असलेल्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणे शक्य होत आहे. यामध्ये जुन्नर १७९, आंबेगाव १८०, खेड आळंदी १९३, शिरुर २२०, भोसरी २३५ आणि हडपसर २६१ मतदान केंद्रांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या नियंत्रण कक्षातून या यंत्रणेद्वारे मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवणार आहेत.
           शिरुर लोकसभा मतदार संघात २५ लाख ३९ हजार मतदार शिरुर लोकसभा मतदारसंघात २५ लाख ३९ हजार ७०२ मतदार आहेत. जुन्नर विधानसभा मतदारसंघात ३ लाख १२ हजार २०५, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ३ लाख २ हजार १०१ मतदार, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात ३ लाख ५२ हजार ६३४ मतदार, शिरुर विधानसभा मतदारसंघात ४ लाख ३९ हजार २७६ मतदार, भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण ५ लाख ५१ हजार ५८२ मतदार आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात एकूण ५ लाख ८१ हजार ९०४ मतदार आहेत.
           अजय मोरे, निवडणूक निर्णय अधिकारी- शिरुर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी नियोजनाप्रमाणे तयारी करण्यात आली आहे. मतदान पथकाला साहित्याचे वितरण करण्यात आले असून बसेस, जीपद्वारे आज सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत पोहोचतील. पोलीस बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था आदीच्या अनुषंगानेही सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या १३ मे रोजी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार असून पात्र मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!