इंन्स्टाग्राम वरील ओळख अल्पवयीन मुलीस पडली भारी ; फोन करून बोलावून झाला तिच्यावर बलात्कार

Bharari News
0
पुणे जिल्हा प्रतिनिधी
                 सोशल मीडिया मुळे दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून आहे. त्यातच एक घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडलेली आहे. इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीची तरुणा सोबत ओळख झाली होती काही दिवसांनी हया ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्यानंतर या मुलीला पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. त्या तरुणाने या मुलीला भेटायला बोलावले आणि तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना आता उघडकीस आलेली आहे.
सोळा वर्षीय अल्पवयीन पिडीत मुलीने गुरुवार (दिनांक १६) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. यावरुन बाब्या चव्हाण याच्यावर आयपी भा.द. वि. कलम ३७६,३७६/२/आय, पोक्सो कलम ४, १२ नुसार सदरील गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार सन २०२३ ते जानेवारी २०२४ हया कालावधीत खराडी परिसरात घडलेला आहे. 
             पोलिसांन कडील माहिती नुसार, पिडीत तरुणीची आणि आरोपीची २०२३ मध्ये सोशल मीडिया या इंन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. आरोपीने मुलीसोबत मैत्री वाढवलेली होती. तसेच त्यांच्यात संभाषण होऊ लागल्यामुळे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्या. नंतर आरोपीने पिडीत मुलीला खराडी परिसरात भेटण्यासाठी बोलवून घेतले. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील आरोपीने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरुद्ध तक्रार दिली आसून सदरील गुन्ह्याचा पुढील तपास सध्या पोलीस करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!