जोगेश्वरी मंदिरा समोरील तिव्र वळण काढा अन्यथा आंदोलन - चंद्रकांत वारघडे

Bharari News
0
सुनिल भंडारे पाटील 
           नुकतेच थेऊर लोणिकंद (हवेली) रोडचे काम नव्याने झाल्यामुळे अनेक ठिकाणी तीव्र वळण,स्पिडबेकर न लावल्याने अपघात होताना दिसत आहे त्याचप्रमाणे जोगेश्वरी मंदिरा समोर एक तीव्र वळण असल्याने त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात अपघात होत आहेत अनेक जीव त्याठिकाणी गेले आहेत माघील आठवड्यात नुकताच एक अपघात झाला व त्यामध्ये ४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला रोडचे काम चालू असताना चंद्रकांत वारघडे यांनी अनेक वेळा वळण सरळ करण्याची विनंती केली परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला तरीसुद्धा थोड्याफार प्रमाणात सरळ केला परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी संरक्षक जाळी लावल्यामुळे वाहनांना वळणावर वाहण चालवताना कसरत करावी लागत आहे आणि त्यातून अपघात घडत आहेत. 
              त्यामुळे वारघडे यांनी सम्मदित विभाग त्यामध्ये,राज्याचे मुख्य सचिव, बांधकाम सचीव, मुख्य कार्यकारी अभियंता बांधकाम, जिल्हा अधिकारी,पिएम आर डी आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त, पूणे वाहतूक पोलीस आयुक्त, लोणिकंद पोलिस निरीक्षक, उपवनसंरक्षक पुणे, वनपरिक्षेत्र अधिकारी हवेली यांना निवेदन दिले आहे व जर यावर ताबडतोब पर्याय काढला नाही तर तिव्र आंदोलन करणार असल्याचे वारघडे यांनी सांगितले.
          वनविभागाचे अधिकारी यांनी सार्वजनिक रस्त्यावर फीरल्याचे चालते मघ सर्वसामान्य नागरिकांना वेगळा न्याय का त्यांनी वनविभागाचे जागेतून का जायचे नाही हा कुठला न्याय जर वनविभागाने अशाप्रकारे आडमुठेपणा ची भुमिका घेतली तर माहिती सेवा समितीचे कार्यकर्ते वनविभागाची एकही गाडी रस्त्यांवर फीरुण देणार नाही याची नोंद सम्मदित विभागाने घ्यावी व ते वळण काढण्यासाठी विना अट सहकार्य करावे. असे सूचना देण्याचा आली आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!