खळबळजनक...! पुणे येथील अपघात प्रकरणातील पुरावे नष्ट करणाऱ्या डॉक्टरांना पोलिसांकडून अटक

Bharari News
0
पुणे जिल्हा प्रतिनिधी
                पुण्यामधील कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टर अजय तावरे व डॉक्टर श्रीहरी हाळनोर यांची आता पुणे पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आलेली आसून यातील डॉक्टर अजय तावरे याने मी शांत बसणार नाही. मी सगळ्यांचीच नावे घेणार. असा इशाराच चौकशी वेळी पोलिसांना दिला आहे. 
            त्यामुळे डॉक्टर अजय तावरे कोणा कोणाची नावे घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अतुल घट कांबळे नावाच्या मध्यस्थी व्यक्तीला अटक केली असून त्याने या डॉक्टरांना पैसे पुरवल्याचे आता समोर आले आहे. सदरील प्रकरणानामध्ये एका लोक प्रतिनिधीचे नाव देखील समोर आले आहे तसेच त्याने त्याचे नाव घेतले असून याविषयी सखोल तपास पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

कल्याणीनगर (पुणे) अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न झाल्याचे आता समोर आले आहे. सुरुवातीला पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींना मॅनेज करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतर ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या घशात नोटांची बंडल कोंबून थेट रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे. आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल याने डॉक्टर अजय तावरे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधलेला होता. त्यावेळी फोन वरुन एका लोक प्रतीनिधी ने डॉक्टर अजय तावरे यांना आरोपी मुलाला मदत करण्याबाबत सांगितल्याचे पोलिसांच्या तपासात आता समोर आलेले आहे. हे लोकप्रतिनिधी कोण याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांना याबाबत खात्रीलायक माहिती मिळाली असली तरी नाव सांगण्यास पोलीस आता कचरत आहेत. 

तसेच अल्पवयीन आरोपीची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी ही करण्यात आली होती. ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरी हाळनोर या दोन्ही डॉक्टरांनी मिळून अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलेले होते. त्याच्या ऐवजी भलत्याच व्यक्तीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. याप्रकरणात दोघाजनांवरती भा.द. वि. १२० ब, ४६७, २०१, २१२, २१३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आसून, या कटात सहभागी असणे तसेच बनावट कागदपत्र तयार करणे आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे असे आरोप आता त्या डॉक्टरांवर ठेवण्यात आले आहेत. तसेच त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे. अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिलेली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!