पुणे जिल्हा प्रतिनिधी
भिगवण पोलिस ठाण्यामध्ये सदरील गुन्हा रजिस्टर नंबर १८२/२०२४, भा.द.वि. कलम ३८०,३४ नुसार दाखल झालेला आसून फिर्यादी सौ. भाग्यश्री अक्षय जगताप ( वय २६ वर्ष ) व्यवसाय- गृहीणी,रा.शेटफळगडे ता. इंदापूर जि. पुणे येथील रहिवासी आसून यांनी सदरील फिर्याद दिली आहे. की, वार मंगवार दि.१४/०५/२०२४ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शेटफळगडे (जगताप वस्ती ) ता. इंदापूर जि. पुणे येथे फिर्यादीच्या राहते घरी दोन अज्ञात चोरटे यांनी घरामध्ये प्रवेश करून घरामधील सोन्या, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम २० हजार रुपये असा एकुण ५,६७,५०० रुपये किंमतीचे ऐवज चोरी करून चोरून नेहले आहेत. म्हणून सदरील तक्रार ही तक्रारदारा कडून दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भिगवण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सदरील गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून चालू आहे, तसेच गुन्हयातील दोन अनोळखी चोरटे यांचे रेखाचित्र तयार करण्यात आले आसून सदर अज्ञात चोरटे यांच्या रेखा चित्राधारे तसेच वर्णना प्रमाणे शोध घेणे चालू आहे.
अज्ञात चोरटे यांचे वर्णन खालील प्रमाणे आहे, पहिला आरोपी अंदाजे वय २५ ते३० वर्ष आसून तो अंगाने सडपातळ आहे तसेच त्याची उंची साधारणता साडेपाच फुट आहे, त्याचे केस भोरे असून तो रंगाने काळासावळा आहे. तसेच त्याच्या अंगामध्ये काळा रंगाचा फुल भायांचा शर्ट तसेच काळी रंगाची साधी पॅन्ट घातलेली आहे तसेच हातात दोरे बांधलेले आहेत. दुसरा आरोपी अंदाजे वय ३० ते ३५ वर्ष आसून अंगाने मध्यम आहे त्याच्या अंगामध्ये राखाडी रंगाचा शर्ट तसेच निळसर रंगाची पॅन्ट घातलेली आहे.
तरी वरील अज्ञात चोरटे यांचे बाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ भिगवण पोलिस स्टेशन येथे खालील नंबरवर संपर्क साधून माहिती द्यावी. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे अवाहन भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श
विनोद महांगडे मो. नंबर-९४२२१५००५० तसेच पोलिस सब इन्स्पेक्टर रुपेश कदम मो. नंबर-९४२२९७७१२६ यांनी जनतेस केले आहे.