जुन्नर तालुक्यात गारपिटीचा टोमॅटोला फटका

Bharari News
0
जुन्नर प्रतिनिधी सचिन थोरवे
             मे महिना म्हटलं की प्रचंड उष्णता आणि या उष्णतेच्या काळातच उन्हाळी हंगामात शेतकरी टोमॅटोची पीक घेत असतो जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यामध्ये उन्हाळी हंगामाच्या टोमॅटोची सर्वात जास्त लागवड होत असते गेल्या काही वर्षापासून काही गावांमध्ये अति उष्णतेमुळे टोमॅटो पिकावर अनेक रोग येऊ लागल्यामुळे त्याचप्रमाणे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या शेतीविषयक चुकीच्या धोरणांमुळे आणि खते औषधे बियाणे याच्या किमतीमध्ये झालेली भरमसाठ वाढ यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडं मोडले आहे .
            दोन दिवसापूर्वी जुन्नर तालुक्यातील काही भागात उन्हाळी टोमॅटो तोडणी चालू असताना वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी लागली त्यामध्ये काही ठिकाणी हरभऱ्याच्या स्वरूपाच्या गारा बरेच ठिकाणी पडल्यामुळे ऐन भरात असलेल्या टोमॅटो फळावर त्याचा परिणाम झाला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
           ज्या टोमॅटो वरती गारांचा मार बसला आहे असे टोमॅटो जागेवरतीच खराब होत असून मार्केटमध्ये देखील असा माल घेतला जात नसल्यामुळे शेतकऱ्यांवरती टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.
             अथर्व जातीच्या टोमॅटोला 100 रुपये इतका भाव मिळत असून त्यामध्ये शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नाही त्याचप्रमाणे बाजार भाव गारपीट आणि रोगाचा प्रादुर्भाव या तिहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असून भांडवली खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर औषध घेऊन आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे शिरोली बुद्रुक मधील टोमॅटो उत्पादक प्रगतशील शेतकरी स्वप्निल रोकडे यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!