पुणे जिल्हा प्रतिनिधी
दिनांक ९ रोजी प्रमोद भुजबळ,( वय १९) गाव धानोरा, ता.लोहा जि. नांदेड याने मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या नैरास्यातून आत्महत्या केली आसून, त्याने पुढील प्रमाणे चिठ्ठी लिहून हे पाऊल उचलले आहे.
"मी प्रमोद जानकीराम भुजबळ, आज रोजी मराठा समाजाला कुणबी आरक्षण नसल्यामुळे मी NEET ची परीक्षा देऊन सुद्धा माझा रिझल्ट कमी येऊ शकतो. तसेच आरक्षण नसल्यामुळे मी पात्र ठरू शकत नाही. म्हणून मी माझे जीवन संपवत आहे.
म्हणून यावर सर्व मराठा समाजाला माझी विनंती आहे की त्यांनी मनोज दादा जरांगे यांना साथ द्यावी"
अशी चिठ्ठी लिहून प्रमोदने आपले जीवन संपविले आहे
भुजबळ परिवाराच्या दुःखात सकल मराठा समाज सहभागी आहे.
हात जोडून विनंती कोणीही असे पाऊल उचलू नका. आपल्याला हरून जीवन संपवायचे नाही, तर लढून आरक्षण मिळवायचे आहे असे आव्हान मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे.