पुणे जिल्हा प्रतिनिधी
देशात लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्याच मतदान पार पडले. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडलं. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश होता.बारामती लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची लढाई बनलेली होती. तसेच खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा तेथे सामना आहे. पवार विरुद्ध पवार अशी ही राजकीय लढाई तेथ आहे. राजकीय भवितव्याच्या दृष्टीने ही निवडणूक शरद पवार आणि अजित पवार दोघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बारामती कुठल्या पवारांचा बालेकिल्ला आहे हे 4 जूनला निकालानंतरच स्पष्ट होईल. पण त्याआधी बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशी बरच काही घडलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात काही ठिकाणी पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे.
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी यासंबंधी सोशल मीडियावर काही व्हिडिओ पोस्ट केले होते. यात एका गाडीत काही नोटा पडल्याचे दिसत होतं. रात्रीच्यावेळी एक बँक उघडी ठेवण्यात आली होती, असा आरोपही रोहित पवार यांनी केला होता. रोहित पवारांनी ज्या बँकेचा उल्लेख केला, ती पीडीसीसी बँक आहे. रात्रीच्यावेळी बारामतीमध्ये पैसे वाटपासाठी या बँकेचा वापर करण्यात आला, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. आता निवडणूक आयोगाने या आरोपांची दखल घेतली आहे. गरीबांना जी बँक संध्याकाळी पाच वाजता बंद होते, ती मध्यरात्री उघडी कशी? असा सवाल त्यांनी केला होता.
आता निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. बारामती लोकसभेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी पीडीसीसी बँक सुरू ठेवणं, बँक मॅनेजरला महाग पडलं आहे. बँक मॅनेजर वर निवडणूक आयोगाने निलंबनाची कारवाई केली आहे. बँक मॅनेजर या प्रकरणात दोषी आढळल्याने कारवाई केली. सीसीटीव्ही फुटेज तपासल असता 40 ते 50 कर्मचारी आत आढळून आले. निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. मतदानाच्या दिवशी बारामती लोकसभा मतदारसंघात बराच मोठा ड्रामा घडलेला होता.