सुनील भंडारे पाटील
स्वाभिमानी मराठा महासंघ अराजकीय पध्दतीने मराठा समाजाला एकत्र करून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत आहे. मराठा समाजातील बेरोजगारी, मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या हे प्रश्न घेवून देशातील मराठा समाजातील शेतकरी, विद्यार्थी, तरुण, महिला यांना संघटनेसोबत घेत आहे. याच धर्तीवर स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी गजानन गव्हाणे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती पत्र स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले पाटील यांनी नुकतेच दिले.
गजानन गव्हाणे निवडी प्रसंगी म्हणाले की, मराठा समाजातील शेतकरी कर्जबाजारी पणा, आर्थिक विवंचना या गोष्टी मुळे आत्महत्या करत आहेत जो पर्यंत शेतकऱ्यांना शेती मालाला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही. त्यामुळे शेतकरी प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून कार्य करू व समाजाच्या मुद्द्यावर तरुणांना संघटित करुन शिवरायांचे विचार पुढे नेण्यासाठी काम करु.
गजानन गव्हाणे यांच्या निवडीचे स्वागत स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष मराठा रामनारायण, राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस राजबीर सिंह, राष्ट्रीय चिटणीस सलील सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गौरव पवार, कार्याध्यक्ष दिपक दादा पवार, महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष कोकीळा पवार, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अनिता पाटील, प्रदेश कार्याध्यक्षा अमृता पठारे, प्रदेश उपाध्यक्षा मायाताई देशमुख, महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष पदी सीता जाधव, युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष अभिजित खैरे, प्रदेश कार्याध्यक्ष युवा आघाडी लखन घाडगे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रुपेश दळवी, पुणे जिल्हा अध्यक्ष देवदत्त पोखरकर, महिला आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षा अलका सोनवणे, हवेली तालुका अध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे, शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे पाटील आदिंनी केले आहे.