आअलंकापुरीत नागरिकांसह भाविकांना सेवा सुविधाना प्राधान्य देण्याचे आदेश
आळंदी प्रतिनिधीअर्जुन मेदनकर
आषाढी वारी निमित्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आळंदीत प्रशासकीय अधिकारी, पालखी सोहळ्याचे संबंधित पदाधिकारी यांच्या समवेत आळंदी येथील दर्शनबारी जागा, भक्ती सोपान पुल, स्कायवॉक, नदी पात्रातील जलपर्णी, प्रदक्षिणा मार्ग यांची पाहणी करून सर्व प्रशासकीय यंत्रणाना यात्रा काळात भाविक, नागरिक यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्राधान्य देण्याचे सूचनादेश पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अधिकारी, कर्मचारी तसेच पालखी सोहळ्यातील संबंधित यांना दिले.
या पाहणी दौऱ्या प्रसंगी पुणे जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, खेड तहसीलदार प्रशांत बेडसे, हवेली प्रांत आसवले, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके, श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पा., नगरपरिषदेचे विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
या पाहणी दौ-यात पुणे जिल्हाधिकारी दिवसे यांना उपस्थितांनी विविध सेवा सुविधांची मागणी केली. या मागण्या बाबत सुसंवादः साधत पुणे जिल्हाधिकारी दिवसे यांनी दरवर्षी प्रमाणे दर्शन बारीची जागा वारी कालावधीत प्रशासनाच्या ताब्यात घेण्याचे आदेश लवकरात लवकर निर्गमित करण्याच्या सूचना हवेली प्रांताधिकारी अस्वले यांना दिल्या. तसेच भक्ती सोपान पुलाची डागडुजी साठी आवश्यक निधी मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या. इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी काढणे बाबत पिंपरी चिंचवड महानगर पालिका यांचे सहकार्य घेतले जाईल तसेच येत्या काळात जलपर्णी नियमित काढता यावी या साठी आळंदी नगरपरिषदेस जेसीबी, पोकलँड मशीन खरेदी करण्यास निधी उपलब्ध करून दिला जाईल असे जिल्हाधिकारी दिवसे यांनी सांगितले.
सुरक्षित वारी, हरित वारी या संकल्पनेवर आधारित या वर्षीची वारी असावी, राज्यभरातून वारी साठी येणाऱ्या भाविकांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणानी आपापसात समन्वय ठेवून कामकाज करण्याचे सूचनादेश पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आळंदीतील अचानक पाहणी दौऱ्यात उपस्थित अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांना दिले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, माजी नगरसेवक डी डी भोसले पाटील यांनी विविध मागण्या करीत संवाद साधला. पुणे जिल्हाधिकारी दिवसे यांनी अचानक पाहणी दौरा करीत येथील कामाची पाहणी करीत आषाढी यात्रा तयारीचा आढावा घेतला.