सुनील भंडारे पाटील
वासुली गाव (तालुका खेड) येथील तलाठी कार्यालय मधील तलाठी 30 हजारांची लाच मागणी करत, प्रत्यक्ष 20 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात लाचलुचपत पतिबंधक विभाग पुणे यांच्या जाळ्यामध्ये सापडला आहे,
महाळुंगे पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड गुन्हा रजिस्टर नंबर 370/2024 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सण 1988 कलम 7 नुसार आरोपी लोकसेवक सतीश संपतराव पवार वय 52 वर्षे पद तलाठी वर्ग 3, सजा वासुली तालुका खेड जिल्हा पुणे याला लाच स्वीकारताना रंगे हात अँटी करप्शन ब्युरो पुणे यांनी ताब्यात घेतले आहे,
यामधील तक्रारदार यांचे वडिलोपार्जित शेत जमिनीचा ऑनलाईन सातबारा उताऱ्यावर त्यांचे नाव दिसत नसल्याने नाव दिसण्यासाठी तलाठी सतीश पवार याने तक्रारदार यांचेकडे 30 हजार रुपयांची लाच मागणी केल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरो पुणे यांना प्राप्त झाली होती, सदर तक्रारीची पडताळणी केली असता 17.5.2024 रोजी आरोपी लोकसेवक सतीश पवार याने सातबारावर नाव दिसण्यासाठी 30 हजारांची मागणी करून 20 हजार रुपयांची लाच प्रत्यक्ष 10.06.2024 रोजी पंचा समक्ष स्वीकारल्यावर त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध माळुंगे पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे,
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शितल जानवे, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे,