पुणे जिल्हा प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील निरगुडे गावचा सामाजिक कार्यकर्ता भगवान बापू खारतोडे व खडकवासला कालवा संघर्ष कृती समिती यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे.डाळज नंबर दोन या ठिकाणी इंदापूर तालुक्याला पाणी सोडण्यात यावे यासाठी लक्षवेधी असा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी आंदोलकांना खडकवासला सिंचन प्रकल्प अधिकारी श्वेता कुऱ्हाडे यांनी आश्वासित केले की सदरील प्रस्ताव हा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलेला आहे व तीन जून रोजी पाणी सोडण्याचे सर्वोत्परी प्रयत्न करू त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते भगवान बापू खारतोडे व संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे पार पडली त्यानंतर असे ठरले की तीन जून नंतर इंदापूर तालुक्याला पाणी सुटले नाही तर पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भगवान बापू खारतोडे यांनी संबंधित विभागाला दिला होता.
त्यानंतर शेटफळगडे येथील सिंचन प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते भगवान बापू खारतोडे तसेच विजू काळे आणि इतर चार ते पाच जण गेले त्यानंतर सदरील अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर सबंधित यंत्रणा ही अलर्ट झाली आणि इंदापूर तालुक्याला तीन जूनला पाणी सुटेल त्यानंतर आंदोलन स्थगित केले या पाण्याच्या संपूर्ण श्रेय हे निरगुडे गावचे सामाजिक कार्यकर्ते भगवान बापू खारतोडे, विजू काळे तसेच खडकवासला कालवा संघर्ष कृती समितीला जाते हे आंदोलनाचे सर्वात मोठे यश आहे.