१७ वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेच्या राष्ट्रीय निवड चाचणी करीता जाणता राजा कुस्ती केंद्राच्या ५ कुस्तीगीरांची निवड - पै.संदीप भोंडवे

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
            १७ वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ओमान ( जाॅर्डन ) येथे दिनांक २२ ते ३० जुन दरम्यान होत आहे ... या आशियाई कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाची निवड चाचणी स्पर्धा दिनांक ७ जुन २०२४ रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे .
          या निवड चाचणीत सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाची निवड चाचणी दीनांक २ जुन रोजी हनुमान आखाडा पुणे येथे संपन्न झाली. या निवड चाचणीत जाणता राजा कुस्ती केंद्रांच्या ५ कुस्तीगीरांनी नेत्रदीपक कामगिरी करत महाराष्ट्राच्या कुस्ती संघात स्थान मिळवले,
             या कुस्तीगीरांना जाणता राजा कुस्ती केंद्राचे एन.आय.एस. कुस्ती कोच महीपत कुंडु , पै.सुरज तोमर व पै.संतोष यादव यांचे मार्गदर्शन लाभले .... निवड करण्यात आलेल्या पाच कुस्तीगीरांची नावे पुढीलप्रमाणे
फ्रीस्टाईल..
४५ कीलो - पै. वक्रतुंड फदाले 
४८ कीलो - पै. विशाल शिळीमकर
५१ कीलो - पै. रोहन भडांगे
६५ कीलो - पै. ओमकार काटकर
ग्रिकोरोमन..
५१ कीलो - पै. साईनाथ पारधी

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!