पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुरातत्व खात्याच्या देखरेखीत सुरू असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात नुकतेच एक भुयार सापडले व त्यात काही पुरातन मूर्त्या सापडल्या आहेत. खरतर या माध्यमातून मंदिराचे जुने स्वरूप समोर आले असुन काही जुन्या गोष्टी जशास तशा समोर आल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे संत भानुदास महाराजांची समाधी होय.
तिचे मूळ स्वरूपही यानिमित्ताने प्रकट झाले आहे. ज्या ठिकाणी भुयार सापडले त्याच सोळखांबीच्या परिसरात हे स्थान आहे. सोळखांबी मंडपातून चौखांबी मंडपात जाताना उजव्या हातास प्रथम जो दगडी चौथरा दिसतो तीच संत भानुदास महाराजांची समाधी होय.
आपण जेंव्हाही मंदिरात जाल त्यावेळी या स्थानाचे जरूर दर्शन घ्या कारण हे त्या सत्पुरुषाचे स्थान आहे की जे स्वतः शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांचे पणजोबा आहेत व यानीच कर्नाटकात नेलेली आपल्या पांडुरंगाची मूर्ती पंढरपुरात परत आणली आणि त्यामुळेच आपण पांडुरंगाची वारी पंढरपुरला जाऊन करु शकतो.
ही अज्ञात माहिती तसेच वारकरी संप्रदायाचा खरा इतिहास सर्व भाविक भक्त व महाराष्ट्रामधील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचावा