लोणी काळभोर प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे शासन मान्यता नसताना अनधिकृतपणे विनापरवाना पहिली ते चौथी सेमी इंग्लिश शाळा चालू होती .आणि अचानक सेमी इंग्लिश बंद करून मराठी शाळा सुरू करीत असल्याचे शाळेने सांगताच पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला त्यांनंतर पालकांनी ठिय्या आंदोलन करताच
सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण फीचे पैसे परत मिळणार असुन याच शाळेत शिकणार्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना पाचवीत सेमी इंग्लिश शाळेत प्रवेशास प्रथम प्राधान्याची लेखी हमी मिळणार आहे .या प्रमुख दोन मागण्या पोलीस प्रशासन , पालक आणि ग्रामस्थ यांच्या समोर अमित हरपळे (ट्रस्टी श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट)यांनी आठ दिवसाच्या आत कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे .
फुरसुंगी येथील श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट संचलीत श्री शंभू महादेव पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाच्या मनमानी कारभारामुळे तेथील पालकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.
या शाळेने मराठी माध्यमाची परवानगी असताना मागील अनेक वर्ष सेमी माध्यमाला मुलांना प्रवेश देऊन पालकांची दिशाभूल करत त्यांच्याकडून लाखो रुपये वार्षिक फी गोळा केली होती परंतु आता हे जमलेले नाटक जास्त काळ चालणार नाही हे समजताच त्यांनी पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश आता मराठी माध्यमात झाला आहे असे सांगितले त्यामुळे पालक याबाबतीत जाब विचारण्यास गेले असता त्यांना याठिकाणी अरेरावीची भाषा वापरण्यात आली.याचा परिणाम शाळेच्या प्रांगणात सर्व पालक ठिय्या आंदोलन करण्यास बसले होते.हडपसर येथील पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब जाधव तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी येऊन उपस्थित पालक तसेच संस्थाचालक यांच्यात समेट घडवून आणला . व संस्थाचालक यांच्याकडून सदरील झालेल्या प्रकाराची माहिती घेत एका आठवड्यात योग्य ती कार्यवाही करावी अशी तोंडी हमी घेतली आहे.
फुरसुंगी येथील ग्रामस्थ विशाल हरपले यांनी सदरील प्रकार उजेडात आणलेला असून सदरील संस्था ही पालकांसोबत शासनाला देखील फसवत आहे असे म्हणणे त्यांनी मांडले.शासनाच्या अनुदानावर शाळा सुरू असताना पालकांकडून फिच्या नावाखाली प्रत्येकी ३ हजार ते ५ हजार फी शालेय विकास निधी म्हणून गोळा करत आहेत.तसेच महाराष्ट्र शासन मोफत पाठ्यपुस्तके देत असताना काही पुस्तकांच्या किंमती वसूल केली जात आहे.शाळा सुरू केल्यापासून आजपर्यंत या फिचा आकडा कोटीच्या घरात गेलेला आहे.तसेच प्रवेश देताना देखील पालकांची हेळसांड करत आहेत .तेथील कर्मचाऱ्यांच्या देखील अनेक अडचणी असून ट्रस्टी त्यांची मुस्कटदाबी करताना पाहण्यास मिळत आहे असे त्यांनी सांगितले.तसेच पालकांच्या मते नवीन प्रवेश १८१ असून पाच हजार प्रमाणे त्यांची यावर्षी फी घेतली गेलेली आहे व जुन्या विद्यार्थ्यांकडून तीन चार हजार रुपये फी जमा केलेली आहे जर अनुदानित शाळा असेल तर नक्की या पैशांचे होते काय हा पालकांना पडलेला प्रश्न आहे
शिक्षण विभाग उदासीन
फुरसुंगी या ठिकाणी घडलेल्या प्रकाराबाबत मागील दोन दिवसांपासून गटशिक्षण अधिकारी ज्ञानदेव खोसे यांना सदरील बाबींची कल्पना देऊन देखील सदरील अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेतली नाही व पालकांना शासकीय नियमानुसार अर्ज करा मग मी माहिती घेतो असे सांगण्यात आले.शासकीय अधिकाऱ्यांच्या अशाच कागदी घोडे नाचवण्याच्या सवयींमुळे अनेक अनधिकृत शाळा सर्रास सुरू असून अशा शाळांकडे हे अधिकारी का कानाडोळा करत आहेत याबाबत पालकांच्यामध्ये उलट सुलट चर्चा सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे
मी आजच सदरील प्रकाराची माहिती घेतलेली आहे.संस्थेच्या धोरणांमुळे कोणत्याही पालकांवर व विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेणार आहोत व पालकांचे आर्थिक नुकसान आम्ही होऊ देणार नाही.याबाबत त्वरित आम्ही कार्यवाही करणार आहोत.पालकांना विश्वासात घेऊन आम्ही सेमी माध्यमाचा प्रस्ताव दाखल करनार आहोत.शाळेमध्ये पालकांना जो त्रास झाला त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो व असे प्रकार भविष्यात घडणार नाहीत याची आम्ही नक्की काळजी घेऊ.
अमित हरपळे
(ट्रस्टी श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट)
सदरील बाब उजेडात आणल्याने पालकांना न्याय मिळाला याबाबत राहुल हरपळे,नंदू चौधरी,सागर खुटवड,दत्ता कोंढाळकर,अमोल कामठे,विशाल पवार,संतोष आबणावे,प्रशांत हरपळे,विलास कोळपे,धनश्री हरपळे,शैलजा रंजवे,चैताली पवार,पूनम कांबळे आदी पालकांनी आभार मानले.