सुनील भंडारे पाटील
नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन पुणे आणि बकोरी वनराई प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रकांत दादा पाटील उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री यांच्या वाढदिवस व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बकोरी येथील वनराई प्रकल्पामध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन उपक्रमा अंतर्गत हवेली मधील भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप दादा कंद यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करन्यात आले.
या वेळी बाकोरी वनराई प्रकल्प व माहिती सेवा समितीचे अध्यक्ष.चंद्रकांत वारघडे, नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष व प्राचार्य पी. डी.इए. शंकरराव उसळ कॉलेज ऑफ फार्मसी खराडी,डॉ.सचिन कोतवाल, वाघोली येथील ज्येष्ठ उद्योजक.नृसिंह सातव पाटील,भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे डॉ.पोपटराव जाधव, प्रा.प्रवीण जावळे,डॉ.संपत नवले प्राचार्य डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोरेगाव भीमा, प्रा.नरहरी पाटील ,प्राचार्य लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी फुलगाव, डॉ.गौरीशंकर स्वामी प्राचार्य भालचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी खानापूर,डॉ.प्रशांत हंबर जेएसपीएम इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ताथवडे,डॉ.अमोल शहा प्राचार्य सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर , एवरेस्टविर धनराज वारघडे उपस्थित होते.
या वेळी चंद्रकांत वारघडे यांनी वनराई प्रकल्पाची माहिती सांगितली. डॉ.सचिन कोतवाल यांनी कार्यक्रमाची भूमिका सांगितली .आजच्या या परिस्थितीत फार्मसी क्षेत्रातील तज्ज्ञ वृक्षरोपण आणि वृक्षसंवर्धन याबाबत जागरूक असल्याचे आशादायक चित्र असून यातून विद्यार्थ्यांमध्ये मोठा संदेश जाईल अशी अपेक्षा व्यक्त करत नॅशनल फार्मसी असोसिएशन चे कौतुक प्रदिपदादा कंद यांनी केले.त्यांनी वारघडे यांना वृक्ष संवर्धन कामी शुभेच्छा ही दिल्या. या वेळी चिंच, वड,पिंपळ अशा वीस देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमास फार्मसी क्षेत्रातील शिक्षक , कर्मचारी उपस्थित होते.