सुनील भंडारे पाटील
सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यामध्ये अवैध दगडखान उद्योगाचे भांडे फोड झाले असून गौण खनिज तहसीलदार ज्योती देवरे यांच्या रुद्र अवताराने दगडखान चालकांचे धाबे दणाणले आहेत, शासनाच्या तसेच जनतेच्या डोळ्यांमध्ये माती टाकून चाललेले उद्योग आता बंद झाले आहेत, यावर तोडगा म्हणून धडाडीच्या तहसीलदार देवरे यांच्या बदलीसाठी पडद्यामागून रात्री अपरात्री दगडखान उद्योजकांच्या मीटिंग, मंत्रालयात चक्रा चालू झाले आहेत, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे,
पुणे जिल्ह्यातील दगड खान उद्योगांमध्ये गेल्या वीस वर्षांमध्ये एवढी धडाडीची कारवाई कधीच झाली नव्हती, त्यामध्ये खडी , क्रेशड, रॉयल्टी चे मुख्य पावती न ठेवता वाहतूक, रॉयल्टी परवानगी पेक्षा जास्त उत्खनन, व इतर बऱ्याचशा गोष्टी आता उघड झाले असून गौण खनिज तहसीलदार ज्योती देवरे यांच्या लक्षात आले आहे, संबंधित दगडखान उद्योजकांनी सर्व नियमांचे उल्लंघन करून शासनाची खूप मोठी फसवणूक केली असल्याने धडाडीच्या तहसीलदार देवरे यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रोन द्वारे खान उत्खननाची मोजणी चालू केल्याने, खान उद्योजकांची झोप उडाली आहे, गेल्या दोन दिवसात संबंधितांनी खान बुजवण्याचे प्रयत्न चालू केले आहेत,
त्याचप्रमाणे रात्री अपरात्री सर्व खान उद्योजक एकत्र येऊन वेगवेगळे प्लॅन आखात आहेत, धडाडीच्या तहसीलदार देवरे यांच्या बदलीसाठी काय करता येईल यासाठीचे नियोजन आखले जात आहे, त्यासाठी मंत्रालयापर्यंत चकरा मारले जात असल्याची चर्चा पुणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे,