जेएसपीएम कॉलेज वाघोली (तालुका हवेली) येथे पूर्तता कॉम्प्युटर एज्युकेशन कोरेगाव भीमा यांच्या वतीने करिअर गायडन्स तसेच सायबर सिक्युरिटी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे निखिल शाळीग्राम सर तसेच जी एस पी एम कॉलेजचे प्राचार्य काळे सर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले सायबर क्राईम कसे होतात व ते होऊ नये म्हणून सोशल मीडियाचा कशाप्रकारे वापर करावा आर्थिक व्यवहार करताना कुठल्या काळजी घ्याव्यात याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच दहावीनंतर शाखेची निवड कशी करावी याविषयी मुलांना मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमास पूर्तता कम्प्युटरचे नवनाथ सावंत सर, सावंत मॅडम, काजल कम्प्युटर तळेगाव ढमढेरे चे किरण ढमढेरे सर , जेएसपीएमच्या सुप्रिया गुंडाळ मॅडम, सहाणे सर इत्यादी इत्यादी लोकांनी परिश्रम घेतले
यामध्ये 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला