सुनील भंडारे पाटील
ज्ञानदा फाऊंडेशन, पुणे या संस्थेच्या समग्र साक्षर अभियान या उपक्रमाअंतर्गत आणि नितीन माहेश्वरी यांच्या सहकार्याने ससुन वसाहत पुणे स्टेशन येथील बालविकास शिक्षण संस्था प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बालमित्र उजळणी पुस्तकाचे वाटप करण्यात आले,
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांनी मनोगत व स्वागत केले. हडपसर परिसरातील अमॅनोरा लेबर कॅम्प येथील मजूरांच्या मुलानां शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन येण्यासाठी बालविकास शिक्षण संस्था प्राथमिक शाळा नेहमी अग्रेसर असते. या शाळेत विद्यार्थ्याना नियमित शिक्षण दिले जाते. तसेच शिक्षणाबरोबर या मुलानां नियमित मध्यान्ह भोजन देखिल दिले जाते.
कोणतेही शुल्क न घेता या विद्यार्थ्याना मोफत शिक्षण दिले जाते. आज ज्ञानदा फाऊंडेशन आणि नितीन माहेश्वरी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्याना बालमित्र उजळणी पुस्तकाचे वाटप होत यांचा आम्हाला आनंद होत आहे. असे मुख्याध्यापिका जाधव मॅडम म्हणाले,
तसेच शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये या करिता ज्ञानदा फाऊंडेशन या संस्थेने समग्र साक्षर अभियान हा उपक्रम सन-2021 साली सुरू केला असून या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद, विना अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, अक्षर ओळख होऊन शैक्षणिक पाया भक्कम व्हावा म्हणून विविध शाळांमध्ये शैक्षणिक पुस्तकांचे मोफत वितरण केले जाते.
त्याचप्रमाणे बालविकास शिक्षण संस्था प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना बालमित्र पुस्तकांचे वाटप करण्यात आले असल्याचे राहुल पोखरकर यांनी माहिती दिली. या कार्यक्रमास नितीन माहेश्वरी, कोमल माहेश्वरी,विवेक नायडू मानसेवी अधिकारी नागरी संरक्षण दल.विवेक कांबळे वरिष्ठ लिपिक, ओंकार पोखरकर ही उपस्थित होते.