पुणे जिल्हा प्रतिनिधी
बारामती इंदापूर तसेच दौंड तालुक्यातील सुपा यवत दौंड भिगवन परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस अचानकपणे ड्रोन दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच ड्रोन दिसल्याने विविध प्रकारच्या अफवा नागरिकांमध्ये पसरल्याने अचानक दिसणारे हे ड्रोन नक्की काय प्रकार आहे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
ड्रोनमुळे निर्माण झालेल्या अफवा तसेच नागरिकांमधील भीतीचे वातावरण यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष तज्ञांची मदत घेतली जाणार आहे तसेच बारामती सोपा वडगाव निंबाळकर यवत दौंड आणि भिगवन परिसरात ड्रोन आढळून आले तर नागरिकांनी पुढील पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा,
बारामती शहर पोलीस स्टेशन -०२११२-२२४३३३, सुपा पोलीस स्टेशन-०२११२-२०२०३३, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन-०२११२-२७२१३३,
दौंड पोलीस स्टेशन-०२११७-२६२३३३,
यवत पोलीस स्टेशन-०२११९-२७४२३३ या संपर्क क्रमांक वरती तसेच नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण-०२०-२५६५७१७१,२५६५७१७२
संपर्क क्रमांकावर ती नागरिकांनी संपर्क करावा अशी आवाहन पुणे ग्रामीण पोलीस यांनी केले आहे तसेच रात्रीच्या वेळी दिसणारे ड्रोनमुळे नागरिकांनी भयभीत होऊ नये तसेच अफवांवरती विश्वास ठेवू नये व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात आलेले आहे.