सुनील भंडारे पाटील
पुणे शहर पोलीस दलात अंतर्गत बदल्या करण्यात आल्या त्याच अनुषंगाने पुणे शहर पोलीस दलातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी सावळाराम साळगांवकर यांची नियुक्ती करण्यात आली. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला असून त्यानंतर अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या
साळगांवकर यांचा पोलीस दलातील दांडगा अनुभव पाहता लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत ते नक्कीच चमकदार कामगिरी करतील अशी आशा नागरिकांना वाटू लागली आहे .परंतु पोलिस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्यासमोर अनेक आव्हाने असणार आहेत. यामधील प्रमुख आव्हान म्हणजे लोणीकंद पोलिस ठाण्यात गेले काही दिवसांमध्ये घडलेल्या असलेल्या घटनेमुळे लोणीकंद पोलीस ठाण्याची प्रतिमा खराब झाली आहे ही प्रतिमा सुधारण्याची महत्त्वाची जबाबदारी पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्यावर असणार आहे.
तर लोणीकंद पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस दलाची शिस्त लावण्याची मोठी जबाबदारी साळगांवकर यांच्यासमोर असणार आहे. येणाऱ्या तक्रारदारास कर्मचाऱ्यांकडून योग्य अशी वागणूक मिळावी , नागरिकांच्या शंकांचे समाधान व्हावे अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टींकडे साळगांवकरांना लक्ष द्यावे लागणार आहे. तर लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक पान शॉप वरती सुरू असलेल्या नशेली पानांची विक्री थांबवून त्यावर कायद्यानुसार योग्य कारवाई करत तरुणांना व्यसनापासून दूर करणे.
एकूणच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्र पाहता वाघोली परिसरात वाढती गुन्हेगारी रोखून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे महत्त्वाचे आहे,