पुणे जिल्हा प्रतिनिधी
दुःखद घटना धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील शेतकरी तसेच शेतकऱ्याचे दोन बैल हे विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडल्याची, मन सुन्न करणारी सदरील घटना घडलेली आहे. अवघ्या ४० वर्षाच्या वयात केवळ दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना आपला जीव हा गमवावा लागला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहिरीच्या अथवा बोरवेलच्या विद्युत पुरवठ्यासाठी इलेक्ट्रिक वायर, स्टाटर लावलेले असतात तेथे वायर कट झाल्याने विद्युत पुरवठा खंडित होवुन आजूबाजूच्या परिसरात करंट उतरलेले असते, म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मोटरच्या पेटी जवळ जाताना काळजी घ्यावी जेणेकरून अशी दुर्दैवी घटना घडणार नाही. यासाठी शेतकरी राजाने काळजी घेणे गरजेचे आहे.
जेणेकरून शेतकरी सावधान होतील, आणि अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत.सध्या दिवसाची लाईट आहे काही विद्युत तारा ह्या जमिनीपासून अत्यंत कमी अंतरावर आहेत. या गोष्टींकडे महावितरण काळजी पुर्वक लक्ष देत नाही त्यामुळे माझ्या शेतकरी राजाचं विनाकारण बळी हे जात आहेत म्हणून त्याची ही काळजी शेतकरी राजाने आर्वजून घेतली पाहिजे, तसेच आपल्या शेतामधील लोखंडी पोलांचीही काळजी ही घेतली पाहिजे , जेणेकरून अशा दुःखद घटना घडणार नाहीत, शेतकरी राजाला कामाचा लोड भरपूर आहे पण त्याचा जीवही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण त्याची बायका पोरं ही त्याच्यावर अवलंबून आहेत. तसेच घरातील कर्ता पुरुष गेला तर त्या घराची पुर्णपणे दुर्दशा होते म्हणून माझ्या शेतकरी राजाने आपली पावसाळ्यामध्ये काळजी घेतली पाहिजे.