पुणे जिल्हा प्रतिनिधी
१४ जून रोजी तलाठी कार्यालय निरगुडे ता. इदापूर जि. पुणे येथे आमरण उपोषणाला भगवान बापू खारतोडे बसणार आहेत हे प्रशासनास समजताच आपल्या विभागांसंदर्भात जे विषय प्रलंबीत आहेत ते मार्गी लावण्याचे काम प्रशासनाचे चालू केले आहे परंतु खालील विषय जर सोडवले नाही तर अमरण उपोषण करणार असा इशारा निरगुडे गावचे शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते भगवानराव खारतोडे यांनी सबंधीत प्रशासनास दिला आहे.
२) वितरिकेच्या शेवटच्या टोका पर्यंत पाणी गेले पाहिजे.
३) खरीप हंगामातील बाजरी कांदा सोयाबीन तूर पिक विमा दोन हप्ते शेतकरी खात्यात जमा करावेत.
३) खरीप हंगामातील दुष्काळ निधी ९ कोटी ८२ लाख रुपये वंचित शेतकरी खात्यात जमा करावा.
४) ज्वारीचा पिक विमा शेतकरी खात्यात जमा करावा.
५) पिके जळुन गेल्याने (खरीप, रब्बी , ऊस), संपूर्ण वीजबिल माफी करण्यात यावी.
७) शेतकरी KYC करुन खरीप दुष्काळ निधी पैसे जमा झाले नाहीत त्या शेतकरी राजाचे पैसे DBT पोर्टल ने लवकरात लवकर खात्यावर जमा करावेत.
८) शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात बियाणे व खते शासनाकडून मोफत देण्यात यावी
म्हणून १४ जून रोजी होणारे आमरण उपोषण स्थगित करून २१ जून रोजी निरगुडे तलाठी कार्यालयासमोर होणार आहे. अशी माहिती माध्यमांना भगवान खारतोडे यांनी दिली आहे.