बीड मतदान मोजणी केंद्रावर प्रितम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जाऊन फेरमतमोजणीची मागणी केली
बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असून बजरंग सोनवणे यांचा 6 हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे.बीडमध्ये सामाजिक विषयावरून झालेलं मतांचं धृवीक रण आणि मनोज जरांगे पाटील फॅक्टर यामुळे पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला अशी चर्चा आहे.
बीड लोकसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाली. बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्यात लढत होती. मनोज जरांगे पाटील फॅक्टरमुळे बीड लोकसभा निवडणूक चुरशीची बनली असे मानले जात होते. त्यामुळेच सुरुवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या फेरीत पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतली. शेवटपर्यंत दोन्ही उमेदवार आघाडी आणि पिछाडीवर जात होते. अखेर राज्यात सर्वात शेवटी बीडचा निकाल जाहीर झाला आणि बजरंग सोनवणे विजयी झाले.
निकालानंतर उशिरा बीड मतदान मोजणी केंद्रावर प्रितम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जाऊन फेरमतमोजणीची मागणी केली आहे,