उरुळी कांचन प्रतिनिधी
पुणे - सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी फाट्यावर पिक अप टेम्पो पलटी होऊन प्रचंड वाहतूक कोंडी झाली . सोरतापवाडी हद्दीतुन नर्सरीची रोपे भरून सोलापूरच्या दिशेने पिकप टेम्पों चालला होता .यावेळी पुण्याच्या दिशेने वळण्यासाठी सोरतापवाडी फाट्यावर आला असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव मालवाहू टेम्पोने पिकअपला धडक दिल्यामुळे पिकप महामार्गावर पलटी झाला .
त्यामुळे गाडीचे व नर्सरीच्या रोपांचे खूपच नुकसान झाले .त्यामुळे पुणे - सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली . यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे हवेली तालुका अध्यक्ष गणेश आढाव व मारुती सुझुकी शोरूमचे दत्ता शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भर पावसात महामार्गावरील रोपे बाजूला घेतली व वैभव चौधरी यांच्या जेसीपी मशीनच्या साह्याने पिकप टेम्पो उचलून बाजूला घेतला. गणेश आढावा त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली .