मातृतिर्थ सिंदखेडराजा ते पाचाड रायगडजिजाऊ महाअभिवादन यात्रा 2024जन्मस्थळ सिंदखेडराजा ते समाधीस्थळ पाचाड रायगड
पुणे जिल्हा प्रतिनिधी
15 जून ते 17 जून 2024
जिजाऊ महा अभिवादन यात्रेचे नेतृत्व लखोजी राजे जाधव यांचे वंशज श्री शिवाजी राजे जाधव यांच्या नेतृत्वात ही महा अभिवादन यात्रा निघणार आहे
दिनांक 15 जून 2024 रोजी लखोजी राजे जाधव सिंदखेडराजा यांच्या राजवाड्यातील पवित्र जल घेऊन ही महाअभिवादन यात्रा पाचाड रायगड किल्ल्याकडे प्रस्थान करणार आहे सकाळी 7 वाजता जिजाऊ पूजन व महा अभिवादन करण्यात येईल.
तसेच सकाळी 8 वाजता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून जिजाऊ महा अभिवादन यात्रेत सुरुवात होईल ही महाअभिवादन यात्रा पुढे जिजाऊ सृष्टी मार्गे न्हावा येथे रथयाञेचे जंगी स्वागत होईल व पुढे रथ यात्रेचे प्रस्थान करून ही रथयात्रा सकाळी 9 वाजता जालना येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन करून ही रथयत्रा गांधी चमन येथे सकाळी 9:15 वाजता रथयाञेचे जंगी स्वागत होईल.
ही रथयाञा शहरातून प्रस्थान करून पुढे छञपती संभाजी महाराज चौक मोतीबाग येथे 9:30 वाजता रथयाञेचे जंगी स्वागत होईलही रथयाञा पुढे चंदन झिरा येथे 9:45 वाजता रथयाञेचे जंगी स्वागत होईल या ठिकाणी चाय नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे ही रथयाञा पुढे सेलगाव येथे सकाळी 10 वाजता रथयात्रेचे जंगी स्वागत होईल.
तसेच ही रथयात्रा बदनापुर येथे सकाळी 11 वाजता रथयात्रेचे जंगी स्वागत होईल व पुढे रथयात्रेचे शेकटा येथे सकाळी 11:30 वाजता रथयात्रेचे स्वागत होईल ही रथयात्रा मार्गक्रमण करून करमाड येथे दुपारी 12 वाजता जंगी स्वागत होईल ही रथयात्रा पुढे लाडगाव येथे दुपारी 12:15 वाजता रथयात्रेचे स्वागत होईल पुढे ही रथयात्रा शेद्रा चौक जिजाऊ चौक कॅब्रीज येथे 12:30 वाजता जंगी स्वागत होईल .
तसेच ही रथयाञा चिकलठाणा येथे दुपारी 12:45 वाजता रथ यात्रेचे जंगी स्वागत होईल ही रथयाञा पुढे मार्ग क्रमन करून मुकुंदवाडी येथे दुपारी 1 वाजता रथयात्रेचे जंगी स्वागत करण्यात येईल तसेच ही रथयात्रा पुढे मार्गस्थ करून *जय भवानीनगर दुपारी 1:30 वाजता रथयात्रेचे जंगी स्वागत करण्यात येईल ही रथयाञा पुढे हनुमान नगर येथे रथयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात येईल ही रथयात्रा पुंडलिक नगर येथे दुपारी 1:45 वाजता रथ यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येईल तसेच ही रथयात्रा गजानन महाराज चौक मार्ग हेडगेवार हॉस्पिटल त्रिमूर्ती चौक मार्गे जव्हार काॅलनी मार्गे आकाशवाणी मोढानाका दुध डेअरी मार्गे क्रांती चौक येथे दुपारी 2 वाजता रथयात्रेचे जंगी स्वागत करण्यात येईल ही रथयाञा पुढे बाबा पेट्रोल पंप मार्गे पंढरपूर येथे दुपारी 2:30 वाजता रथयाञेचे स्वागत होईल व पुढे वाळूज येथे दुपारी 2:45 वाजता रथयाञेचे स्वागत होईल .
पुढे माननीय दिलीप बनकर पाटील यांच्या हॉटेलवर दुपारी 3 वाजता रथ यात्रेचे जंगी स्वागत होईल व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे दुपारी 4 वाजता ही रथयात्रा प्रस्थान करून गंगापूर येथे दुपारी 4:30 वाजता रथयात्रेचे जंगी स्वागत करण्यात येईल व पुढे कायगाव गोदावरी येथे सायंकाळी 5 वाजता रथयात्रेचे जंगी स्वागत करण्यात येईल. हि रथयात्रा पुढे स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकास अभिवादन करून ही अभिवादन याञा प्रवरा संगम येथे 6 वाजता रथ यात्रेचे जगी स्वागत होईल पुढे ही रथयात्रा मार्गस्थ करून नेवासा येथे सायंकाळी 6:30 वाजता यात्रेचे स्वागत होईल पुढे ही रथयात्रा घोडेगाव येथे सायंकाळी 7 वाजता रथ यात्रेची जंगी स्वागत होईल ही रथ यात्रा पुढे पांढरीचा पूल येथे सायंकाळी 7:30 वाजता स्वागत होईल.
ही रथयाञा पुढे जेऊर फाटा येथे 8 वाजता रथयाञेचे जंगी स्वागत होईल तसेच रथयाञा पुढे नगर येथे रात्री 9 वाजता रथयाञेचे जंगी स्वागत होईल व मुक्कामाची सोय करण्यात आली आहे.
दिनांक 16 जून 2024 रोजी नगर इथून सकाळी 8 वाजता यात्रेचे प्रस्थान होईल व पुढे सुपा येथे सकाळी 9 वाजता रथ यात्रेचे स्वागत व चाय नाष्टा करण्यात येईल.
पुढे ही रथयाञा मार्गस्थ करून यात्रेचे राजनगाव गणपती येथे सकाळी 10 वाजता जंगी स्वागत करण्यात येईल व पुढे शिक्रापूर येथे सकाळी 11 वाजता रथयाञेचे स्वागत करण्यात येईल व पुढे मार्गस्थ करून ही रथयाञेचे स्वागत वढू बुद्रुक येथे 11:30 वाजता करण्यात येईल तसेच छत्रपती संभाजी महाराजांना महा अभिवादन करून ही रथयाञा पुढे वाघोली येथे दुपारी 12 वाजता रथ याञेचे जंगी स्वागत होईल तसेच पिलाजीराव जाधव यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच ही रथयात्रा पुढे मार्गस्थ करून लाल महाल पुणे येथे दुपारी 1:30 वाजता यात्रेचे आगमन होईल व लाल महाल येथे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ व छत्रपती शिवरायांना वंदन करण्यात येईल व पुढे यात्रेचे दुपारी 2 वाजता प्रस्थान करण्यात येईल ही यात्रा पुढे चांदणी चौक येथे दुपारी 3 वाजता यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येईल तसेच ही रथयात्रा पुढे महाड येथे जेवणाची व मुक्कामाची सोय करण्यात आली आहे तसेच मुक्कामाच्या ठिकाणी रथयात्रेमध्ये सहभागी झालेल्या समाज बांधवांचा परिचय करून देण्यात येणार आहे.
दिनांक 17 जून 2024 रोजी जिजाऊ स्मृतिदिन सकाळी 8 वाजता ही रथयात्रा महाड येथून प्रस्थान करून ही रथयात्रा पाचाड येथे सकाळी 9 वाजता लखोजी राजे जाधव यांच्या राजवाड्यातील आणलेल्या पवित्र जलाशयाने ही स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांचे पूजन करण्यात येईल व सकाळी 10 वाजता महा अभिवादन करण्यात येईल सकाळी 10:30 वाजता या ठिकाणी मान्यवराची मनोगत व्यक्त करण्यात येईल आणि सकाळी 11:30 वाजता कार्यक्रमाचा समारोप होईल त्यानंतर सर्व शिवभक्त रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी जाणार आहोत...
या अभिवादन यात्रेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून सर्व शिवभक्त सहभागी होणार आहेत.