पुणे जिल्हा प्रतिनिधी
१७ जून इ.स.१६३१
बेगम मुमताज़ हीचा वयाच्या ३८व्या वर्षी मृत्यू
वयाच्या १७ व्या वर्षी शहाजहानचे पहिले लग्न इराणी राजवंशातील मुलगी कदाहर महल हिच्याशी झाला. पुढे ३ वर्षांनी शहाजहानचे लग्न असफखानाची मुलगी अर्जुमंद बानु म्हणजेच मुम्ताज महल हिच्याशी झाले. (अर्जुमंद बानु ही जहांगीरच्या पत्नीची म्हणजे महेर उन्नीसाची पुतणी). लग्न सोहळा समारंभ तब्बल महिना भर चालु होते आसे दिल्लीच्या शहाजहान चा इतिहास या पुस्तकात म्हटले आहे.
लग्न झाले तेव्हा ती शहाजहान पेक्षा १४ महिन्यांनी लहान होती. मुम्ताज नवऱ्याच्या सहवासात तब्बल १९ वर्षे होती. या १९ वर्षाच्या वैवाहिक आयुष्यात मुम्ताजला शहाजहान पासुन १४ वेळा संतती प्राप्ती झाली. मुम्ताज व शहाजहान यांस झालेल्या पुत्रांमद्धे ८ मुले व ६ मुली होत्या. पहिली मुलगी महिरुन्निसा ही केवळ तीन वर्षे जगली. दुसरी मुलगी जहांनारा बेगम हीचा जन्म १६१४ मद्ये होऊन मृत्यू १६८१ मद्ये झाला.
तिसरा व चौथा मुलगा दारा शुकोह तसेच शहाशुजा याचा जन्म अजमीर येथे झाला. पाचवी मुलगी रौशनरा बेगम ही बुऱ्हानपूर येथे जन्माला आली. सहावा मुलगा जो पुढे मोघली रियासतीची ओळख बनुन राहिला. तोच आलमगीर औरंगजेब सन १६१८ साली जन्माला आला. पुढील अपत्ये अनुक्रमे उमेदबक्ष, मुलगी सुरय्या बानु बेगम हे वयाचा कमी वयातच दगावले तसेच नववा मुलगाही नाव ठेवण्याआधी मृत्यू पावला. दहावा मुलगा मुराद बक्ष याचे नाव मोघली रियासतीस ठळक पणे वाचायला मिळते. पुढे लुत्फुल्ला व दौलतब्जा हे दोन्ही पुत्र केवळ एक एक वर्षे जगले. सन १६३० मद्ये मुम्ताजला १३ वी मुलगी झाली. जी जन्मताच वारली. सन १६३१ मद्ये शहाजहान व मुम्ताज यांना गौहरारा बेगम ही मुलगी झाली.सन ७ जून १६३१ रोजी १४ व्या मुलीला जन्म देताना बुऱ्हानपूर येथे मुम्ताजचा मृत्यू झाला. १४ व्या कन्येला जन्म देताना प्रसुती वेदनांमुळे मुम्ताज हिचा मृत्यू झाला. तिला तब्बल ३० तास वेदना होत होत्या.
आपला मृत्यू समीप आला आहे हे जाणून तिने आपला पति शहाजहान या कडून दोन वचने मागीतली. ती म्हणजे आपल्या पश्चात शहाजहानने परत विवाह करु नये. आपल्या व आपला पति शहाजहान याच्या अपूर्व प्रीतीचे स्मारक उभारले जावे. मुम्ताज च्या मृत्युचे प्रदीर्घ परिणाम शहाजहानच्या जीवनावर झाले. मुम्ताज सोडून इतर दोन बायका देखील होत्या, (एक मुज्फर हुसेन ची मुलगी तर दुसरी शहानवाज खानाची मुलगी) मात्र त्यांच्याशी केलेले विवाह हे केवळ राजकीय हेतु साध्य करण्यासाठी केले होते. त्यात प्रेमाचा अंश न्हवता. शहजहानचा जीव जडला होता तो मुम्ताज बेगम मध्ये
१७ जून इ.स.१६३३
इ. स. १६३० पासून १६३६ पर्यंत पहिली सहा वर्षे बालशिवाजी राजांसह जिजाबाई शहाजीराजांच्या हुकुमानुसार घोड्यावरून एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर फिरत होत्या. निजामाची राजधानी दौलताबाद हा किल्ला मोगलांनी १७ जून १६३३ मध्ये आपल्या ताब्यात घेतला. तेव्हा शहाजीराजांनी संगमनेर येथील पेमगिरी उर्फ भीमगड (शहागड) येथे निजामशहाची गादी स्थापिली व स्वतः वजीर बनले. ह्यावेळी राजमाता जिजाबाई शिवाजी राजांसह जुन्नरास होत्या.
आपल्याला पकडण्यासाठी मोगल सरदार येत आहे हे समजताच त्यांनी शिवरायांस शिवापुरी पाठवून दिले. त्यानंतर मोगल सरदाराने जिजाऊना पकडून नाशिक येथे कैदेत ठेवले.राजमाता जिजाबाईंचा चुलता जगदेवराव जाधव याच्या सांगण्यावरून त्यांची सुटका झाल्यावर शिवाजीराजांसह त्या शहाजीराजियांबरोबर राहण्यासाठी संगमनेर येथील पेमगिरीस गेल्या. काही दिवसांनी त्या किल्ल्यास विजापूरकरांनी वेढा दिला. तेव्हा शहाजीराजे निजामशहास घेऊन माहुलीस गेले. व बरोबर जिजाबाई व बाळराजे शिवाजी राज्यांस ठेविले. त्या किल्ल्यासही विजापूरच्या फौजेने वेढा घातला तेव्हा किल्ला लढविण्याची शिकस्त करून वेढा उठेना म्हणून सल्ल्याची बोलणी केली व माहुली किल्ला खाली करून दिला.
१७ जून इ.स.१६७४ं
(ज्येष्ठ वद्य नवमी, शके १५९६, आनंदनाम संवत्सर, वार बुधवार)
राजमाता_जिजाऊ_माँसाहेब_पुण्यतिथी
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री"
"राजमाता जिजाऊ माँसाहेब" यांचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे निधन.
आनंदनाम संवत्सरात ज्येष्ठाच्या वद्य नवमीला आऊसाहेबांची प्राणज्योत मालवली. थोरल्या महाराज स्वामींचे मातृछत्र उडाले.
राजा पोरका झाला, दिशा शुन्य झाल्या, आधार संपला, अंधार उरला, फक्त घनदाट अंधार
आता शिवबाला "बाळ" म्हणणारे जगात
कोणीही उरले नाही
महाराज एकाएकी प्रौढ झाले.
महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि "छत्रपती श्री शिवाजी महाराज" आणि "युवराज शंभुराजे" यांच्या आचरणात ज्यांनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज पेरलं, ती आई म्हणजे "जिजाऊसाहेब". त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल,
म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते.
काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात.
सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले.
एक स्वाभिमानाची जननी काळाआड गेली,
पण स्वाभिमानाच साम्राज्य बघूनच!
स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.
१७ जून इ.स.१६८१
(आषाढ शुद्ध द्वादशी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार शुक्रवार)
सरसेनापती नेतोजी पालकर व हिरोजी फर्जंद यांनी शहजादा अकबराची भेट घेतली.
छत्रपती संभाजी महाराजांचे शिष्टमंडळ अर्थात सरसेनापती नेतोजी पालकर आणि हिरोजी फर्जंद शहजादा अकबर आणि दुर्गादास राठोड यांची भेट घेऊन किल्ले रायगडावर आले. हिरोजी फर्जंद मार्फत छोटासा नजराणा आणि खलिता पाठवून शहजादा अकबर आणि दुर्गादास राठोड आता छत्रपती संभाजी महाराजांच्या पुढच्या हालचालीकडे लक्ष देऊन बसले.
१७ जून इ.स.१७५७
१७ जून च्या सुमारास मराठे यमुनेपलिकडे दुआंबात उतरले. अंताजी माणकेश्वरांनी सिकंदराबादचा प्रदेश कबजात घेतला. पण मुख्य उद्योग दिल्ली ताब्यात घेण्याचा होता. दिल्लीस सर्व अखत्यार नजीबखानाकडे असून अंतर्वेदचा प्रदेश त्याचे ताब्यात होता. गाजीउद्दीन नजीबखानास काढून लावण्यास उत्सूक होता त्याना दादास मी आपला दोस्त, आपण येऊन बंदोबस्त करावा असे पाचारण केले त्यावेळी सिद्ध झाले. नजीबखानास ही बातमी कळताच त्यास आपला अंतर्वेदीचा प्रदेश जाणार याची धास्ती पडून त्याने मल्हाररावातर्फे दादाची मनधरणी करण्यास सुरुवात केली व आपली ६ कलमी शांतता योजना राघोबास सादर केली. त्यापैकी मराठ्यांनी काही अटी मान्य केल्या. अंतर्वेदीत अंताजी माणकेश्वरची फौज उतरली होती. तीने सहारणपूर पासून इटाव्यापावेतोचा तमाम प्रदेश अल्पायासे व्यापला. आता दिल्लीच घेण्याचे काम बाकी राहिले.
१७ जून इ.स१८९५
(ज्येष्ठ वद्य दशमी, शके १८१७)
आगरकर यांचे निधन !
शके १८१७ च्या ज्येष्ठ व १० रोजी महाराष्ट्रांतील थोर समाजसुधारक, बुद्धिवादी पुरुष, 'सुधारक' पत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन झालें.
१७ जून इ.स.१९१४
(ज्येष्ठ वद्य नवमी, शके १८३६)
लोकमान्य टिळक यांची मंडाले येथील दीर्घकालीन कारावासातून मुक्तता होऊन ते पुण्यास येऊन पोहोचले