सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यातील दगड खाणी उद्योजकांकडून परवानगी मधील अनेक नियमांचे उल्लंघन करून दगड खाणी चालवल्या जात होत्या, त्याचप्रमाणे शासनाच्या महसूल खात्याच्या डोळ्यात माती टाकत कोट्यावधी रुपयांचे नुकसान करत असलेल्या उद्योजकांना धडा शिकवण्याचे काम गौण खनिज तहसीलदार ज्योती देवरे यांनी युद्ध पातळीवर सुरू केले होते,
परवानगीच्या कितीतरी पट उत्खनन, नागरिकांना त्रासदायक पुणे शहराच्या दिशेने गौण खनिज वाहतूक यामुळे नागरिक त्रस्त झाले होते, त्याचप्रमाणे दगड खाणीतून उडणाऱ्या धुळीचा आजूबाजूच्या गावांना ,शेतीला होणारा त्रास, या सर्व गोष्टींचा विचार करता महसूल गौण खनिज खात्याकडून आतापर्यंतच्या कालावधीत कारवाया का झाले नाहीत? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे,
पुणे गौण खनिज तहसीलदार ज्योती देवरे यांनी समाजाच्या भल्यासाठी तसेच शासनाच्या फायद्यासाठी धडाडीचे पाऊल उचलले असताना, संबंधित गौण खनिजाची चोरी ,लबाडी लपवण्यासाठी, संपाचा बहाना करणाऱ्या उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी भरारी पथकच रद्द करण्यात आले, या सर्व गोष्टी समाज उघड्या डोळ्यांनी पाहत असून या चर्चेला सर्वत्र उधान आले आहे,
गेल्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यातील काही दगड खाणींचे ड्रोन द्वारे सर्वेक्षण करण्यात आले होते, या सर्वेक्षणाचा रिपोर्ट तयार झाला असून यावर अप्पर जिल्हाधिकारी पुणे अजय मोरे यांची काय कारवाई असेल याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे,