नारायणगाव पोलीस स्टेशन आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ४२५ रक्तदात्यांनी केले रक्तदान प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट प्रशस्तीपत्र आणि आणि पाच लाखांचा अपघाती सुरक्षा कवच एपीआय महादेव शेलार यांची माहिती
प्रतिनिधी सचिन थोरवे
नारायणगाव (तालुका जुन्नर) पोलीस स्टेशन यांच्या वतीने नारायणगाव पोलीस स्टेशन मिटींग हॉल या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
सकाळी दहा वाजता चालू झालेले रक्तदान शिबिर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उत्स्फूर्तपणे चालू होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्या रक्तदान शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपले हजेरी लावली .
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला नारायणगाव पोलीस स्टेशन यांच्या वतीने हेल्मेट त्याचप्रमाणे प्रशस्तीपत्र आणि पाच लाख रुपयांचा अपघाती विमा सुरक्षा कवच हे देण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी जुन्नर तालुका राष्ट्रवादीचे नेते अमित बेनके जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके ,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश भाऊ वाजगे ,शिवसेना तालुकाप्रमुख माऊली शेठ खंडागळे ,कथे डायग्नोस्टिकचे डॉक्टर पंजाबराव कथे डॉक्टर पिंकी ताई कथे पत्रकार किरण वाजगे, अश्फाक पटेल ,ओतूर पोलीस स्टेशनचे एपीआय लहू थाटे नारायण गावचे सरपंच बापू भाऊ पाटे उपस्थित होते शेतकरी संघटनेचे नेते आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रमोद खांडगे, योगेश तोडकर ,सचिन थोरवे ,अनिल गावडे, यांनी देखील उपस्थित राहून रक्तदान शिबिरात रक्तदान केले .नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील पोलीस पाटील नारायणगाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी अधिकारी यांनी देखील या ठिकाणी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचा सांगता समारंभ वेळी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांची प्रमुख उपस्थिती रक्तदान शिबिरात लाभली उपस्थित सर्वांचे आभार नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी मानले.