जुन्नर प्रतिनिधी
दिनांक 13/06/2024 रोजी वारूळवाडी (तालुका जुन्नर) येथे पुणे नाशिक महामार्गावर गनपिर हॉटेल चे पाठीमागे साईबाबा मंदिर परिसरात डिंबा डावा कालवा मध्ये एक बजाज कंपनीची डिस्कवर गाडी MH 45-M 5602 ही गाडी ग्रामसुरक्षा दलाचे जवान निलेश निंबाळकर यांना कालव्यामध्ये पडलेली दिसून आली त्यांनी लगेच वारूळवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र यांना फोन द्वारे ही माहिती दिली..
पोलीस पाटील.. वारूळवाडीयांनी api महादेव शेलार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली.पोलीस नाईक मंगेश लोखंडे यांना घटनास्थळी घेऊन जाऊन ग्रामसुरक्षा दलाचे जवान आदित्य डेरे शंतनु डेरे यांच्या मदतीने ही गाडी कालव्याबाहेर काढली
ती गाडी पोलीस स्टेशन येथे आणून त्या गाडीचे गाडी नंबर व चेसी नंबर वरून मूळ मालक यांचा शोध घेतला असता ती मोटार सायकल श्री भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ऊसतोड कामगार.. बीड... ता..आष्टी.. या ठिकाणची असल्याचे समजले आहे ...
चासी नंबर व गाडी नंबर वरून मोबाईल नंबर मिळून पोलीस नाईक मंगेश लोखंडे यांनी पोलीस पाटील यांना नंबर मिळवून दिला व त्यांना पुढील संपर्क करावयास सांगितला त्या माणसांना संपर्क झाल्यानंतर ती गाडी ..गाव.. चांडोली. बु. तालुका ..आंबेगाव.. जिल्हा पुणे या ठिकाणावरून पाच ते सहा दिवसांपूर्वी चोरी झाल्याची तक्रार मंचर पोलीस स्टेशन येथे त्यांनी दिली होती. ...
त्यांना नारायणगाव पोलीस स्टेशन बोलवण्यात आले ..गाडीचे सर्व कागदपत्रे तपासून त्यांना ती गाडी मालकांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.
त्यांनी ग्रामसुरक्षा दलाचे जवान व पोलीस पाटील वारूळवाडी पोलीस नाईक मंगेश लोखंडे साहेब यांचे आभार मानले आहे...
नारायणगाव पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मंगेश लोखंडे व पोलीस जवान सचिन सातपुते पोलीस जवान आनंदा चौगुले ग्राम सुरक्षा दलाचे जवान /पोलीस पाटील यांनी मोटर सायकल मिळण्यात मोठी मदत झाली आहे.