वृक्षरोपण कार्यक्रमाप्रसंगी शिक्रापूर विद्याधाम प्रशाला या शाळेचे विद्यार्थी तसेच 1987 सालची दहावीची बॅच तसेच आशा सेविका विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ यांच्या समवेत शिक्रापूर ग्रामपंचायत पासून मुख्य पेठ पोस्ट ऑफिस जुना पूल तसेच तळेगाव रोड चव्हाण कॉम्प्लेक्स या परिसरातून भव्य स्वरूपात रॅलीचे आयोजन करण्यात आले,
या रॅलीमध्ये झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा पर्यावरण वाचवा, जय जवान जय किसान अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या त्यानंतर रॅलीचे रूपांतर भव्य सभेमध्ये होत असताना शिक्रापूर नगरीचे विद्यमान सदस्य सुभाष मामा खैरे यांनी सूत्रसंचालन केले तसेच आर्ट ऑफ लिविंग चे श्री प्रभाकर जगताप साहेब यांचा सन्मान शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच श्री रमेश बबनराव गडदे यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर आर्ट ऑफ लिविंग चे प्रभाकर जगताप साहेब यांनी लक्ष्मी तरु या झाडाविषयी सविस्तर माहिती विशद करण्यात आली तसेच शिक्रापूर नगरीच्या उपसरपंच सारिका ताई सासवडे यांनी झाडाविषयी माहिती व झाडांचे संगोपन करण्याचे आव्हान करण्यात आले त्यानंतर विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य सोनबापू गद्रे सर यांनी मनोगत व्यक्त केले,
त्यानंतर 1987 सालच्या दहावीच्या बॅचचे रमेश करपे यांनी मनोगत व्यक्त केले यानंतर शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच श्री रमेशजी गडदे यांनी झाडाविषयी मार्गदर्शन करीत असताना रामायणातील लक्ष्मणाला ज्यावेळेस बाण लागला त्यावेळेस हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि त्या पर्वतावरील जडीबुटी झाडांपासून औषध तयार केले आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाचे प्राण वाचवले अशा प्रकारची झाडांविषयी माहिती देण्यात आली आणि सर्वांनाआव्हान करण्यात आले की आज आपण लावलेले झाड पुढील वर्षी ते झाड पाहून एक दोन तीन असे क्रमांक काढण्यात येणार आहे आणि त्यामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या अनुक्रमे पाच 5000हजार 3000 हजार 2000 अशा प्रकारचे ग्रामपंचायत च्या वतीने बक्षीस देण्यात येणार आहे ,
या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांमध्ये ग्रामपंचायत शिक्रापूर चे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे ,सदस्य प्रकाश वाबळे ,विशाल खरपुडे ,सदस्या मोहिनीताई मांढरे, सीमाताई लांडे ,उषाताई राऊत ,बाबासाहेब सासवडे ,सोमनाथ भुजबळ ,तानाजी राऊत ,उत्तम सासवडे ,सुरेशजी थिटे ,नंदाताई भुजबळ ,विद्याताई घाडगे ,संपत खरपुडे ,बाळासाहेब मांढरे ,पत्रकार राजाराम गायकवाड ,पत्रकार निलेश जगताप ,लंघे सिस्टर ,कल्पनाताई ढोकले तसेच विद्याधाम प्रशालेचे शिक्षक वृंद अशा सेविका सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी पूजाताई भुजबळ यांनी झाडा विषयी माहिती देऊन साधारण तीन हजार झाडांचे वाटप करण्यात आले व सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले व त्यानंतर शिक्रापूर बाजार मैदान या परिसरा मध्ये वृक्ष लागवड करण्यात आली तसेच या कार्यक्रमांमध्ये विशेष सहकार्य सारिका ताई सासवडे यांचे लाभले तदनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली